'उपग्रहामुळे हवाई दलाची दळणवळण क्षमता वाढेल'

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

जोधपूर : "जीएसएलव्ही - 7 ए' या लष्करी उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे हवाई दलाची दळणवळण क्षमता वाढणार आहे, असा विश्‍वास हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी बुधवारी व्यक्त केला. 

जोधपूर : "जीएसएलव्ही - 7 ए' या लष्करी उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे हवाई दलाची दळणवळण क्षमता वाढणार आहे, असा विश्‍वास हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी बुधवारी व्यक्त केला. 

ते म्हणाले, "आपल्याकडे उपग्रहांद्वारे दळणवळण करण्याची क्षमता असणारी अनेक विमाने आहेत. "जीएसएलव्ही - 7 ए'च्या प्रक्षेपणामुळे असे दळणवळण करणे शक्‍य होणार आहे. इस्त्रोने या उपग्रहाचे प्रक्षेपण आज सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथून केले. भारतीय हवाई दल आणि रशियाच्या हवाई दलाची "एव्हिआइंद्रा-18' या नावाने संयुक्त कसरत सध्या जोधपूर येथे सुरू आहे. त्यात सहभागी झालेल्या दोन्ही देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी हवाई दल प्रमुख धानोआ हे आज जोधूपरच्या हवाई दलाच्या तळावर आले होते. 

Web Title: Because of Satellite the Capacity of Air Force will be increases