वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करारामुळे 6 लाख नोकऱ्यांवर येणार गदा

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

वॉलमार्टने फ्लिपकार्टसोबत करार करुन 77 टक्के भागीदारी विकत घेतली आहे. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार 1.07 लाख कोटी रुपयांमध्ये झाला आहे. मात्र, या करारामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना याचा धोका पोचण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेतील सर्वात मोठी रिटेलचेन वॉलमार्टने भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला खरेदी करण्याची घोषणा केली. त्यानंतर वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार करण्यात आला. या करारामुळे देशातील 3 कोटी व्यापारी धोक्यात येणार असून, सुमारे 6 लाख नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

walmart-flipkart deal

वॉलमार्टने फ्लिपकार्टसोबत करार करुन 77 टक्के भागीदारी विकत घेतली आहे. वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार 1.07 लाख कोटी रुपयांमध्ये झाला आहे. मात्र, या करारामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना याचा धोका पोचण्याची शक्यता आहे. या करारानुसार देशातील 3 कोटी दुकानदारांना थेट नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे देशातील 6 लाख नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता आहे. या कराराला विरोध करण्यासाठी देशातील अनेक व्यापारी एकत्र येणार असून, सरकारला याबाबत आवाहन करणार आहे. 

याबाबत 'कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'चे सचिव जनरल प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले, की वॉलमार्ट-फ्लिपकार्ट करार झाल्यानंतर वॉलमार्टसारख्या कंपन्या जगातून कोणत्याही ठिकाणांहून वस्तू आणता येऊ शकते आणि ती भारतात विकताही येऊ शकते. त्यामुळे देशातील सर्वसामान्य दुकानदार यामुळे मागे राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Because of Walmart Flipkart deal will affect on 6 lakh jobs