त्याच्या पृष्ठभागाला लागले मोहोळ; केंद्रिय मंत्र्यांनी केले ट्विट (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

एका व्यक्तीच्या पृष्ठभागाला मधमाशांचे मोहोळ लागले आहे. हे फक्त नागालँडमध्येच घडू शकते, असे ट्विट आज केंद्रिय मंत्री किरण रिजिजू यांनी केले आहे. रिजिजू यांनी हे ट्विट करतानाच एक व्हिडिओही सोबत जोडला असून या व्हिडिओमध्ये एका तरुणाच्या पृष्ठभागावर मधमाशा बसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

नवी दिल्ली : एका व्यक्तीच्या पृष्ठभागाला मधमाशांचे मोहोळ लागले आहे. हे फक्त नागालँडमध्येच घडू शकते, असे ट्विट आज केंद्रिय मंत्री किरण रिजिजू यांनी केले आहे. रिजिजू यांनी हे ट्विट करतानाच एक व्हिडिओही सोबत जोडला असून या व्हिडिओमध्ये एका तरुणाच्या पृष्ठभागावर मधमाशा बसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
 

रिजिजू म्हणतात की, या व्यक्तीच्या नको त्या भागावर मधमाशांनी कब्जा केला असून हे फक्त नागालँडमध्येच घडू शकते सोबत त्यांनी हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

रिजिजू यांना हा व्हिडिओ नागालँडचे आमदार म्होंलूमो किकॉन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट अपलोड करत टॅग केला होता. रिजिजू यांनी त्यांनंतर तो परत आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे. दरम्यान, किरण रिजिजू हे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beehive in an unlikely place Central minister tweet