भिकारी महिलेने हुतात्मा जवानांना दिली आयुष्यभराची कमाई

devki Sharma
devki Sharma

अजमेर : हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीला देशभरातून ओघ सुरु असताना राजस्थानमधील एका भिकारी महिलेने आपल्या आयुष्यभराची कमाई तब्बल सहा लाख रुपये हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दिले आहेत.

राजस्थानातील अजमेरमधील एका मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या महिलेने दाखवलेली देशभक्ती सर्वांचा कौतुकाचा विषय ठरत आहे. आयुष्यभर भीक मागून जमा केलेली रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबाला देण्यात आली आहे. देवकी शर्मा असे या भीक मागणाऱ्या महिलेचे नाव असून, देवकी शर्मा सध्या या जगात नाहीत. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. मात्र त्यांच्याच इच्छेनुसार त्यांनी जमा केलेली रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दिली आहे.

देवकी शर्मा यांनी अंबे माता मंदिराच्या विश्वस्तांना आपली रक्कम काही चांगल्या कामासाठी खर्च करा असे सांगितले होते. त्यानुसार मंदिराचे विश्वस्त संदीप यांनी देवकी शर्मा यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, त्यांनी जमवलेली रक्कम अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांच्याकडे बँक ड्राफ्टद्वारे सुपूर्द केली. महिलेने भीक मागून जमवलेली संपूर्ण रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली. या महिलेच्या अंतिम इच्छेनुसार ती रक्कम पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या कुटुंबांना देण्यात येणार आहे. देवकी शर्मा भीक मागून जमवलेले पैसे घरात ठेवत होत्या. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंथरुणाखाली आणखी दीड लाख रुपये मिळाले होते. हा पैसाही मंदिर समितीने बँकेत जमा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com