रोहिंग्यांसोबत मानवतेनं वागा; फारुख अब्दुल्लांचा केंद्राला सल्ला

Farooq_Abdullah
Farooq_Abdullah

श्रीनगर : म्यानमार येथून जम्मू-काश्मीरमध्ये स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुस्लिमांना मानवतेची वागणूक द्या, असा सल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी दिली आहे. रोहिंग्या मुस्लिम सध्या सरकारच्या रडारवर आहेत. 

मोदींपेक्षा राहुल गांधीच पंतप्रधानपदी योग्य; निवडणूकपूर्व सर्व्हेत दक्षिणेतील राज्याची इच्छा

जम्मू आणि काश्मीरमध्ये पडताळणी मोहिमेदरम्यान शनिवारी अनधिकृतरित्या स्थलांतर केल्याप्रकरणी १६९ रोहिंग्या मुस्लिमांना ताब्यात घेतले होते. त्याब्यात घेतल्यानंतर त्यांना 'होल्डिंग सेंटर'ला पाठवण्यात आलं. या रोहिंग्यांकडे कोणताही अधिकृत प्रवास परवाना नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Corona Vaccination: मुंबईत लस घेतल्यानंतर 65 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

महिला दिनानिमित्त आयोजित पक्षाच्या अधिवेशनात माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ. फारुख अब्दुल्ला म्हणाले, "आपल्याला बर्मा (म्यानमार) आणि तिथली परिस्थिती माहिती आहे. या देशातील लष्कर काय करतंय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. संयुक्त राष्ट्रांची एक सनद (चार्टर) आहे यावर भारतानंही सही केली आहे. ही सनद आपल्याला स्विकारायला हवी आणि त्यावर काम करायला हवं. या विषयावर माणुसकीच्या दृष्टीकोनातून व्यवहार व्हायला हवा."

राहुल गांधींना शाळेत पाठवायला हवं; असं का म्हणाले गिरिराज सिंह?

जम्मू-काश्मीरमध्ये वर्षभर पुढे ढकलण्यात आलेल्या विधानसभा निवडणूकांबाबत बोलताना अब्दुल्ला म्हणाले, निवडणूक असो वा नसो आम्ही त्याला समोरं जायला तयार आहोत. त्याचबरोबर पत्रकारांनी त्यांना विचारलं की, येत्या काळात होत असलेल्या चार राज्यातील आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचा प्रचार करणार का? यावर उत्तर देताना ते म्हणाले, सध्या माझ्याकडे प्रचारासाठी वेळच नाही." 

Khela Hobe : घरा घरांत मना मनांत टीएमसीला पोचविणा-या नेत्यावरच झाली गेम

दरम्यान, अब्दुल्ला नुकतेच पक्षाच्या मुख्यालयात बोलताना म्हणाले होते की, केंद्राने कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर दहशतवाद संपेल असा दावा केला होता मात्र, अद्याप जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपलेला नाही. ही कलंम हटवल्याला दीड वर्ष झाल्यानंतरही इथे माणसं मारली जात आहेत. नुकतीच श्रीनगरमध्ये एक घटना घडली होती यामध्ये दोन पोलिसांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांना मारणारे मुस्लिमच होते पण दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असंही अब्दुल्ला यावेळी म्हणाले.
 
दरम्यान, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीने (पीडीपी) देखील प्रशासनाला रोहिंग्यांना योग्य प्रकारे वागणूक द्यावी, असा सल्ला दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com