'गे' असणे हिंदुत्वविरोधी : सुब्रमण्यम स्वामी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

कलम 377 वर आज सुनावणी घेण्यात येत आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सात किंवा नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. 

नवी दिल्ली : भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी समलैंगिक संबंध ठेवणारी व्यक्ती ही सामान्य व्यक्ती नसून, ती हिंदुत्वविरोधी असल्याचे सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. त्यामुळे याला गरज आहे, ती वैद्यकीय संशोधनाने ठिक केले जाऊ शकते का याची.  

सर्वोच्च न्यायालयात भारतीय दंडविधान कलम 377 वर आज (मंगळवार) सुनावणी होत आहे. तत्पूर्वी खासदार सुब्रमण्यम स्वामींनी यावर भाष्य केले. समलैंगिकता असणे ही सामान्य बाब नाही. आपण हे साजरी करू शकत नाही. हे हिंदुत्वविरोधी आहे. त्यामुळे यावर वैद्यकीय संशोधन करणे गरजेचे असून, याद्वारे समलैंगिकता ठिक करता येऊ शकते का, हे पाहणे गरजेचे आहे. समलैंगिकता हा अनुवांशिक दोष असल्याचे त्यांनी सांगितले. 

कलम 377 वर आज सुनावणी घेण्यात येत आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे सात किंवा नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडून यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. 

दरम्यान, तृतीयपंथीय, समलैंगिय यांसारख्यांच्या संरक्षणासाठी याबाबतची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून, यावर आता सुनावणी घेण्यात येणार आहे. 

Web Title: Being gay is against Hindutva says BJP MP Subramanian Swamy