बेळगाव एपीएमसीच्या नव्या मार्केटमध्ये भाजीविक्री सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मे 2019

एक नजर

  • बेळगाव एपीएमसीतील नूतन भाजी मार्केटमध्ये आजपासून पालेभाज्यांच्या विक्रीस प्रारंभ. 
  • सकाळी फटाके फोडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या भाजी मार्केटमध्ये वाहनांचे स्वागत.
  • बेळगाव तालुक्यातून 139 टँम्पोतून पालेभाज्यांची आवक.
  • 450 खरेदीदारांचा व्यवहारात सहभाग.

बेळगाव - एपीएमसीतील नूतन भाजी मार्केटमध्ये आजपासून पालेभाज्यांच्या विक्रीस प्रारंभ झाला. सकाळी फटाके फोडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या भाजी मार्केटमध्ये वाहनांचे स्वागत करण्यात आले.

पहिल्याच दिवशी या नव्या मार्केटमध्ये बेळगाव तालुक्यातून 139 टँम्पो पालेभाज्या आल्या. 150 शेतकऱ्यांनी दुचाकीवरून भाजी नूतन मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली. 450 खरेदीदारांनी यामध्ये सहभाग घेतला. बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एपीएमसीतील भाजी मार्केटला अधिक पसंती दिली आहे.

एपीएमसीच्या सचिवांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन चौकशी केली. तर किल्ला भाजी मार्केटमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. येथे विक्रीसाठी येणारा भाजीपाला एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये घेऊन जाण्यास सांगितले जात आहे.

Web Title: Belgaum APMC new market opening