बेळगावच्या बेपत्ता उद्योजकाचा मृतदेह आढळला तलावात 

अमृत वेताळ
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

बेळगाव - शनिवारी (ता.8) घरातून बेपत्ता झालेल्या मजगाव येथील तिप्पण्णा शाबाण्णा सातेरी (वय 67) यांचा मृतदेह अनगोळ येथील तलावात आढळून आला आहे. ही घटना रविवारी (ता.9) सायंकाळी उघडकीस आली असून आज सकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे. 

बेळगाव - शनिवारी (ता.8) घरातून बेपत्ता झालेल्या मजगाव येथील तिप्पण्णा शाबाण्णा सातेरी (वय 67) यांचा मृतदेह अनगोळ येथील तलावात आढळून आला आहे. ही घटना रविवारी (ता.9) सायंकाळी उघडकीस आली असून आज सकाळी मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे. 

तिप्पणा हे एक उद्योजक व म. ए. समितीचे कार्यकर्ते सुध्दा होते. मात्र, गेल्या काही दिवसापासून त्यांचे मानसिक संतुलन ढासळले होते. शनिवारी (ता.8) दुपारचे जेवण घेउन दुचाकीवरुन ते उद्यमबाग येथील कारखान्यावर जातो असे सांगुन घराबाहेर गेले होते. त्यानंतर ते रात्री उशीरापर्यंत पुन्हा घराकडे परतलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीयानी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्यांचा काहीच थांगपत्ता लागु शकला नाही. अखेर या प्रकरणी उद्यमबाग पोलीस स्थानकात तिप्पण्णा बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबीयानी दाखल केली. काल त्यांची दुचाकी पिरनवाडी नाक्‍याजवळ बेवारस अवस्थेत आढळून आली. त्यानंतर सायंकाळी अनगोळ येथील सोमनगिरी तलावात एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना कांहीच्या निदर्शन आला. ही माहिती पोलिसाना समजताच टिळकवाडी पोलिसानी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली. मात्र, अंधार झाल्याने पोलीस घटनास्थळावरुन निघून गेले. ही घटना सातेरी यांच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी हा मृतदेह तिप्पण्णा यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस स्थानकात झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum body of the missing entrepreneur was found in the lake