बेळगावच्या चव्हाट गल्लीतील मराठी शाळेचा शतकमहोत्सव रविवारी

बेळगावच्या चव्हाट गल्लीतील मराठी शाळेचा शतकमहोत्सव रविवारी

बेळगाव - सीमा भागातील अनेक शाळांना मोठा इतिहास आहे. स्वातंत्रपूर्व काळात 1918 साली चव्हाट गल्लीत सुरू झालेल्या मराठी शाळेचा शतक महोत्सव रविवारी (ता.18 ) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शताब्दी महोत्सव समिती व माजी विध्यार्थी यांच्या माध्यमातून जोरदार तयारी केली जात आहे.

शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातुन शाळेला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून  विद्यार्थांना दर्जात्मक व गुणात्मक शिक्षण मिळावे, यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

गल्लीतील नागरिकांनी पुढाकार घेत चव्हाट गल्ली येथे 1918 साली सरकारी मराठी शाळा क्रमांक 5 ची स्थापना केली. गेल्या काही दिवसांपासून शताब्दी महोत्सव सोहळा भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थांनी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली असून क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात माजी विद्यार्थी आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांपासून शाळेतील विद्यार्थी संख्या घटत आहे त्यामुळे माजी विद्यार्थी संघटना आणि इतर माध्यमातून विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे मिळावेत यासाठी पहिली पासूनच इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शाळेची प्रगती होणार असून शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शाळेची रंगरंगोटी व इतर सुधारणा करण्यात आल्या आहेत. शाळेतील काही वर्गांमध्ये स्मार्ट बोर्ड उपलब्ध आहेत. येणाऱ्या दिवसात सर्व वर्गात स्मार्ट बोर्ड बसविले जाणार आहेत.

कार्यक्रमाच्या निमित्याने रविवारी सकाळी 9 वाजता चव्हाटा मंदिरपासून शाळेपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे, दुपारी 3 वाजता ध्वजारोहण व स्मार्ट खोल्यांचे उद्घाटन होईल तर दुपारी 4 वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे.

यावेळी कोल्हापूर येथील जेष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे एफ पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर महापौर बसाप्पा चिक्कलदिनी उपस्थित राहणार आहेत. यावेळी 90 वर्षांवरील माजी विद्यार्थांचा, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. सांयकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. अशी माहिती शताब्दी महोत्सव समितीच्यावतीने देण्यात आली

शताब्दी महोत्सव समिती अध्यक्ष किसन येळ्ळूरकर, खजिनदार डॉ एम एम जाधव, माजी विध्यार्थी संघटना अध्यक्ष दीपक किल्लेकर, कार्यवाह विश्वजित हसबे यांच्यासह शिक्षक व माजी विद्यार्थी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com