बेळगाव येथे मंदिरात दानपेटी फोडून रोकड लंपास

अमृत वेताळ
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

बेळगाव - शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बापट गल्लीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख 8 हजार रुपयांची रक्कम लंपास केली. ही घटना सोमवार (ता. 6) सकाळी उघडकीस आली असून घटनेची नोंद खडेबाजार पोलीस स्थानकात झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातील मंदिरांना चोरट्यानी आपले लक्ष केले आहे. यापूर्वी पाटील गल्ली येथील शनिमंदिरात झालेली चोरीची घटना घडली आहे. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा बापट गल्ली येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आले. चोरट्यांनी मंदिराच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

देवासमोरील दानपेटी फोडून त्यातील सुमारे सात ते आठ हजार रुपयांची रोकड लांबवून पोबारा केला. आज सकाळी नेहमीप्रमाणे मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शहर आणि उपनगरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. 

Web Title: In Belgaum city robbery in temple