बेळगाव : विद्यापीठाच्या अतिक्रमणाविरोधात नगरसेवकांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

आंदोलन काळात जीवाला धोका निर्माण झाला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, आरपीडी क्राॅस जवळ रहदारीची समस्या निर्माण झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यानी दिला आहे.

बेळगाव : आमदार संजय पाटील अधिष्ठाता असलेल्या गोमटेश विद्यापीठाकडून रस्त्यावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या शेड विरोधात नगरसेवक व बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर बुधवारपासून (ता.24) बेमुदत आंदोलन करणार आहेत.

येथील आरपीडी क्राॅस जवळ तंबू ठोकून ते आंदोलनाला बसणार आहेत. सकाळी दहा वाजता आंदोलन सुरू होईल असे त्यानी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. बेळगाव दौर्यावर आलेले नगरविकासमंत्री रोशन बेग यांची मंगळवारी गुंजटकर यानी भेट घेतली व आंदोलनाची माहिती दिली. शेड हटविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलन काळात जीवाला धोका निर्माण झाला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, आरपीडी क्राॅस जवळ रहदारीची समस्या निर्माण झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यानी दिला आहे. गुंजटकर हे रस्त्यावरच तंबू ठोकणार असल्यामुळे रहदारीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

पत्रकात गुंजटकर म्हणतात, गोमटेश विद्यापीठाच्या अनधिकृत शेडबाबत मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास खात्याचे सचिव, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर व उपमहापौरांकडे तक्रार केली आहे. पण अद्याप कारवाई झालेली नाही.

Web Title: belgaum corporators protests against gomtesh university enchroachment