दहावी निकालात चिक्कोडी तिसरा, बेळगाव सहाव्या स्थानावर

मिलिंद देसाई 
सोमवार, 7 मे 2018

बेळगाव - शिक्षण खात्याने सोमवारी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहिर केला. यामध्ये चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा तिसरा तर, बेळगाव शैक्षणिक जिल्हा राज्यात 6 व्या क्रमांकावर आहे.

बेळगाव - शिक्षण खात्याने सोमवारी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहिर केला. यामध्ये चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा तिसरा तर, बेळगाव शैक्षणिक जिल्हा राज्यात 6 व्या क्रमांकावर आहे. चिक्कोडीने गतवर्षीचा आपला क्रमांक कायम राखला असून, बेळगाव जिल्ह्याने 19व्या स्थानावरून  सहाव्या स्थानापर्यंत सुधारणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्याची निकालात सुधारणा झाली असून, समाधान व्यक्त करण्यात येत आहे 

बेळगाव शिक्षण खात्याने सोमवारी दहावीचा निकाल जाहिर केला असून निकालामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्या 6 व्या क्रमांकावर आला असून बेळगाव शैक्षनिक जिल्ह्याचा निकाल 84.77 टक्के लागला आहे तर राज्याच्या निकालात घसरण झाली असून राज्याचा निकाल 71.93 टक्के इतका लागला आहे.

यंदा राज्याच्या एकूण निकालामध्येही घसरण झाली आहे. राज्याचा निकाल कमी लागला असला तरी  बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाला चांगला आहे. गेल्या 3 वर्षात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला पहिल्या 10 मध्ये स्थान मिळविता आले नव्हते. राज्यात उडपी जिल्ह्याने प्रथम क्रमांक तर कारवार जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. पास होणाऱ्यामध्ये विद्यार्थीनींची संख्या अधिक आहे.

78.01 टक्के मुली तर 66.56 टक्के मुले पास झाली आहेत. एकूण 8 लाख 32 हजार 88 विद्यार्थांनी परीक्षा दिली होती यापैकी 6 लाख 2 हजार 802 विध्यार्थी पास झाले आहेत. उद्या (ता. 8) सर्व पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये निकाल उपलब्ध होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल पाहण्यासाठी सायबर कॅफेमध्ये गर्दी झाली होती. विधानसभा निवडणुकीमुळे दहावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती व निकालही लवकर जाहीर करण्यात आला आहे.

Web Title: Belgaum News 10 standard result