गोटूरजवळ अपघातात दोघे तरुण ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

बेळगाव, संकेश्‍वर - अनोळखी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. हे चौघेही युवक गोटूर येथील असून ते पोहण्यासाठी एकाच दुचाकीवरून निघाले होते.

बेळगाव, संकेश्‍वर - अनोळखी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले.

हे चौघेही युवक गोटूर येथील असून ते पोहण्यासाठी एकाच दुचाकीवरून निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या वाहनांची दुचाकीला धडक बसली. आज सकाळी आठच्या सुमारास गोटूरजवळ हा अपघात घडला. प्रदीप जोतिबा बडीगेर (वय 22) व नवीन अशोक शेखनवर (14) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेत विशाल शेखनवर व रवींद्र मासेवाडी हे दोघेजण जखमी झाले आहेत. 

हे चौघेजण आज सकाळी आठच्या सुमारास पोहण्यासाठी पाटील यांच्या विहिरीकडे निघाले होते. हे चौघेजण महामार्गावर आले तेव्हा येथून भरधाव जाणाऱ्या अनोळखी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये चौघेही रस्त्यावर कोसळले. प्रदीप व नवीन यांच्या डोकीला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले, तर अन्य दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी संकेश्‍वर पोलिसांनी धाव घेवून पंचनामा केला. 

Web Title: Belgaum News accident near Gotur