कित्तूरजवळ अपघातात बंगळुरचे तिघे तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

बेळगाव - भरधाव मोटारीची झाडाला धडक बसून तिघे तरुण जागीच ठार झाले. कित्तुर जवळील देगुरहळळी गावाजवळ सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.

बेळगाव - भरधाव मोटारीची झाडाला धडक बसून तिघे तरुण जागीच ठार झाले. कित्तुर जवळील देगुरहळळी गावाजवळ सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.

रघुनाथ  (वय 25 रा. बंगळुरू),  सुधींद्र गौडा (वय 25 रा. बेळकेरी), मल्लिकार्जुन (वय 25 रा.मंडया) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोव्याला गेलेले हे युवक 
गोव्याहून कित्तुर मार्गे आय-20 मोटारीतून बंगळुरूकडे निघाले होते. भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीचे नियंत्रण सुटल्याने मोटार झाडावर जाऊन आदळली. यामध्ये हे तिघेजण ठार झाले तर मोटारीचा चालक व आणखी एक तरुण गंभीर जखमी झाले आहेत. कित्तूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Belgaum News accident near Kittur three dead