चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी आंदोलकांचा अर्धनग्न मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलनाचा आज (ता. 26)  50 वा दिवस होता. त्यादिवशी आंदोलकांनी अर्धनग्न मोर्चा काढून शासनाच्या जिल्हा घोषणेच्या विलंब धोरणाचा निषेध नोंदविला. 

चिक्कोडी - चिक्कोडी जिल्हा मागणी आंदोलनाचा आज (ता. 26)  50 वा दिवस होता. त्यादिवशी आंदोलकांनी अर्धनग्न मोर्चा काढून शासनाच्या जिल्हा घोषणेच्या विलंब धोरणाचा निषेध नोंदविला. 

गेल्या 50 दिवसांपासून जिल्हा मागणीसाठी आंदोलन सुरु असले तरी केवळ शिष्टमंडळाला आश्‍वासन देण्याखेरीज मुख्यमंत्र्यांनी काहीही केलेले नसल्याने शासनाचा निषेध करण्यात आला.

आंदोलनाचे नेते बी. आर. संगाप्पगोळ म्हणाले,"राज्य सरकार व या भागातील राजकीय नेत्यांनी झोपेचे सोंग घेतल्याने अद्याप जिल्हा निर्मितीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. या भागातील खासदार, आमदारांनी केवळ आंदोलनाला पाठींबा देण्याशिवाय काहीही केलेले नाही. जिल्हा घोषणेसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. पण यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. खासदारांनी केवळ स्वतःच्या बळावर यासाठी दिखाव्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण त्यांच्यावर आंदोलकांचा असलेला विश्‍वासही त्यांनी गमावून घेतला आहे. अजूनही वेळ गेलेली नसून या भागातील सर्व नेत्यांनी यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत.'

सोमवारी दुपारी आंदोलकांनी व्यासपीठापासून बसवेश्‍वर सर्कलपर्यंत अर्धनग्न मोर्चा काढला. यावेळी माजी आमदार दत्तू हक्‍क्‍यागोळ, चंद्रकांत हुक्केरी, धोंडिबा हक्‍क्‍यागोळ, निजगुणी आलुरे, धरेप्पा कोळी, एस. व्ही. होन्नावर, बाबु पाटील, शिकांत फकीरे, संजू बडिगेर, बसवराज ढाके, तुकाराम कोळी, सुरेश ब्याकुडे यांच्यासह आंदोलक सहभागी झाले होते. 

Web Title: Belgaum News agitation for demand of Chikodi Taluka