म्हादई प्रश्‍न सहा महिन्यांत सोडवू - अमित शहा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

बेळगाव - कळसा-भांडुरा पाणी प्रश्‍न काँग्रेसनेच भिजत ठेवला आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यास सहा महिन्यांत हा प्रश्‍न सोडविला जाईल, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी (ता. ६) सौंदत्तीत (जि. बेळगाव) दिली. ते भाजप उमेदवार आनंद मामनी यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 

शहा म्हणाले, बेळगाव जिल्ह्यात ऊस उत्पादकांची संख्या मोठी आहे. उत्तर प्रदेश सरकारने १०० दिवसांत ऊस बिले दिली आहेत. भाजप सरकार कर्नाटकात आल्यानंतर १०० दिवसांत बिले अदा केली जातील. काँग्रेस सरकार शेतकरीविरोधी आहे. मलप्रभा नदी काठच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही.’

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात हिंदुत्त्वादी संघटना व भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. केंद्राने कर्नाटकसाठी २.१९ लाख कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. पण, निधी विनियोग वा विकास घडला नाही, असेही ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. ५) गदगमधील कळसा-भांडुरा पाणी प्रश्‍नाच्या मुद्याला हात घातला होता. काँग्रेसमुळेच हा प्रश्‍न भिजत पडल्याची टीका त्यांनी केली होती. 

मुख्यमंत्र्यांना 40 लाखांचे घड्याळ कुणी दिले?
मुख्यमंत्र्यांनी ४० लाख रुपयांचे घड्याळ घातले होते. घड्याळ कुणी वा का दिले, हे सांगण्यास तयार नाहीत. लोक काँग्रेसला कंटाळले असून कर्नाटकात १७ मे रोजी भाजपची सत्ता असेल. येडियुराप्पा मुख्यमंत्री असतील, असा विश्‍वास श्री. शहा यांनी व्यक्‍त केला.

Web Title: Belgaum News Amit Shah comment