‘दूधसागर’ला जाताय; सावधगिरी बाळगा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

खानापूर - देश-विदेशात प्रसिद्ध असलेला गोव्यातील दूधसागर धबधबा आता फेसाळू लागला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे खात्याने धबधब्याकडे जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला आहे. आता कॅसलरॉक व कुळे घाट परिसरात लोहमार्गानजीक वाघ व बिबट्यांचे दर्शन झाल्याने पर्यटकांनी या भागातून जाणे टाळावे, असे आवाहन रेल्वे खात्याने केले आहे.

कॅसलरॉकपासून अकरा किमीअंतरावर असलेला दूधसागरचा धबधबा पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने कोसळतो. सुमारे १,०१७ फुटांवरुन कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. मात्र, पाच वर्षात २० हून अधिक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे. सततच्या पावसामुळे निसरड होते.

पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे दरवर्षी अपघात संभवतात. रेल्वेवर दगडफेक केल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे खात्याने दोन वर्षांपासून दूधसागरला जाण्यास मज्जाव केला आहे.

धबधवा गोव्यातील भगवान महावीर अभयारण्यात आहे. कॅसलरॉक ते कुळे घाट क्षेत्रात लोहमार्गानजीक वाघ आणि बिबट्यांचे दर्शन घडल्याने दुधसागरला जाणाऱ्या पर्यटकांनी दक्षता घेण्याचे आवाहन रेल्वे खात्याने केले आहे. महावीर अभयारण्य प्रशासनाने अद्याप याची दखल घेतलेली नाही. पण, रेल्वेच्या आवाहनामुळे पर्यटकांच्या उत्साहावर विरजन पडले आहे.  

दुधसागर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्याचा ताण रेल्वेवर पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी रेल्वे खात्याकडून निर्बंध घातले जात आहेत. त्याबद्दल पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेने सुविधा उपलब्ध करून दिल्यास रेल्वेच्या महसुलात वाढ होणार असल्याने त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. 
- शंकर गावडा,
पर्यटक

Web Title: Belgaum News Appeal to Dudhasagar waterfall tourist