गोव्याचे पाटबंधारे मंत्री "हरामखोर' - अशोक पट्‌ट्‌ण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

बेळगाव - गोव्याचे पाटबंधारे मंत्री विनोद पालेयकर यांना कर्नाटक सरकारचे प्रतोद्य व रामदूर्गचे आमदार अशोक पट्‌ट्‌ण यांनी आज  हरामखोर असल्याची टीका केली आहे. गोव्याचे मंत्री विनोद यांनी कर्नाटकाला हरामखोर म्हटल्याचा दावा करत आमदार अशोक यांनी ही भाषा वापरली आहे. कर्नाटक हरामखोर नसून गोव्याचे पाटबंधारे मंत्रीच हरामखोर असल्याचे त्यांनी सांगितले. 

कणकुंबी येथील कळसा भांडूरा योजनेच्या ठिकाणी गोव्याचे पाटबंधारे मंत्री विनोद दोन दिवसांपूर्वी भेट दिली. तेथील जल तंट्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात सुरु असताना परिसरात काम सुरु आहे, असा दावा केला. त्यामुळे पाहणी करताना त्यांनी कर्नाटक संदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोप केला.

कर्नाटकाला हरामखोर म्हणणारे मंत्री विनोद यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी केली. 
पहिल्यांदा गोवा मंत्री आणि त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार अशोक यांनी एकमेकावर केलेली खालच्या दर्जाची टीका राजकीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. काही कन्नड संघटना आणि नेत्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गोव्याला नियमित पालेभाजी, दूध आणि विविध जिन्नसचा पुरवठा कर्नाटक करते. त्यावर निर्बंध घालण्याची मागणी करून आर्थिक कोंडी करण्याची मागणी केली. 

Web Title: Belgaum News Ashok Pattan comment