विरोधी गटाशी हातमिळवणी करून वैशाली हुलजी स्थायी अध्यक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

बेळगाव - बेळगाव महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष निवडणूकीत सत्ताधारी गटाच्या नगरसेविका वैशाली हुलजी यांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करून त्यांनी लेखा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविले.

बेळगाव - बेळगाव महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष निवडणूकीत सत्ताधारी गटाच्या नगरसेविका वैशाली हुलजी यांनी विरोधी गटाशी हातमिळवणी करून त्यांनी लेखा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविले.

सत्ताधारी गटाने राकेश पलंगे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले होते. गुरुवारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लेखा स्थायी समिती सदस्या वैशाली हुलजी यांनी गटाच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांनी विरोधी कन्नड व उर्दू गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी गटाच्या संजय सवाशेरी व सतीश देवर पाटील यांनी सूचक व अनुमोदक म्हणून त्यांच्या अर्जावर सही केली. या समितीच्या सात सदस्यांपैकी सत्ताधारी गटाचे दिनेश रावळ या निवडणुकीला गैरहजर राहिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते खासगी इस्पितळात दाखल झाले आहेत. त्यांनी महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी यांना पत्र पाठवून त्याची माहिती दिली. रावळ यांच्या अनुपस्थितीमुळे लेखा स्थायी समितीचे सहा सदस्यच उपस्थित राहिले. सत्ताधारी गटाकडून पलंगे यांनी अर्ज दाखल केला पण त्यांना सूचक मिळाले नाहीत. त्यामुळे पलंगे यांनी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे हुलजी यांची लेखा स्थायी अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पण त्यांनी गटाच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे मराठी नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मिनाक्षी चिगरेही अध्यक्षपदासाठी इच्छूक होत्या पण त्यांनी गटाच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. 

2015 साली हुलजी यांना अर्थ स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. तत्कालीन आमदार संभाजी पाटील यांनी त्यांना आपल्या कक्षात बोलावून अध्यक्ष होण्याची विनंती केली होती. पण आपल्याला महापौर व्हायचे आहे असे सांगून हुलजी यांनी अध्यक्षपद नाकारले होते. आता त्यांनी अध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाशी प्रतारणा केली. मराठी भाषिकांच्या मतांवर निवडून आलेल्या हुलजी यांच्या या कृतीचा सर्वत्र निषेध होत आहे. 

वैशाली हुलजी यांच्या अध्यक्ष निवडीमागे बेळगाव शहरातील एका लोकप्रतिनिधीचा हात असल्याची चर्चा सत्ताधारी गटात आहे. त्या लोकप्रतिनिधीने संजय सवाशेरी व सतीश पाटील यांना हुलजी यांच्या अर्जावर सही करण्याची सूचना दिली होती. पुढील महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या राष्ट्रीय पक्षाच्या तयारीची ही रंगीत तालीम असल्याचेही मराठी नगरसेवकांचे म्हणने आहे.

मला महापौरपद हवे होते त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपद नाकारले होते. पण आता संधी मिळाल्यामुळे मी अध्यक्ष झाले आहे. संजय शिंदे. सत्ताधारी गटनेते- वैशाली हुलजी यानी सत्ताधारी गटाशी गद्दारी केली आहे. यापुढे गटाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.

- वैशाली हुलजी

Web Title: Belgaum News Belgaum corporation politics