म.ए. समितीने पोलिस अधिकाऱ्यांना विचारला जाब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

बेळगाव -  काळ्या दिनाच्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर भाषिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवून चौघाकडून प्रत्येकी 5 लाखांचा जामीन आणि तितक्याच् रकमेचा जात मुचलका मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आज ( गुरुवारी ) जाब विचारण्यात आला.

बेळगाव -  काळ्या दिनाच्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर भाषिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवून चौघाकडून प्रत्येकी 5 लाखांचा जामीन आणि तितक्याच् रकमेचा जात मुचलका मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आज (गुरुवारी) जाब विचारण्यात आला.

लिंगायत समाजाच्या मोर्च्यावेळी किती जणांना नोटीस बजवण्यात आली? खासदार सुरेश अंगड़ी टिपू सुलतान जयंतीला विरोध करून दोन धर्मांत द्वेष निर्माण करत आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली? असा सवाल करत समिती नेत्यांनी अटक झाली तरी बेहत्तर पण जामीन घेणार नाही. मराठी जनता नेत्यांविना काळादिन करण्यास सक्षम आहे. पण त्यावेळी उदभवणाऱ्या स्थितीस पोलीस प्रशासन जाबाबदार राहील, असा इशारा समितीने पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांना दिला.

काळ्यादिनाची परवानगी बाबत चर्चा करताना समिती नेत्यांनी पोलिसांचा पक्षपात उघड केला. पोलीस आयुक्त तीन दिवसांच्या सुट्टीवर असून ते बेळगावात आल्यानंतर परवानगी बाबत चर्चा करण्यात येईल असे लाटकर यांनी सांगितले. यावेळी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार, प्रकाश मरगाळे, माजी आमदार दिगंबर पाटील आदि उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Black Day cases isssue