देशी बनावटीच्या बोगी टेस्टिंग मशीनची बेळगावातील ‘हैड्रोपॅक’कडून निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

बेळगाव - देशातील पहिली भारतीय बनावटीची रेल्वे बोगी टेस्टिंग मशीन बनविण्याचा मान बेळगावला मिळाला आहे. होनगा औद्योगिक वसाहतीतील हैड्रोपॅक इंडिया प्रा. लि.ने ‘मेक इन इंडियां’तर्गत या मशीनची निर्मिती केली आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी या मशीनची यशस्वी चाचणीही घेतली. लवकरच ती दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.

बेळगाव - देशातील पहिली भारतीय बनावटीची रेल्वे बोगी टेस्टिंग मशीन बनविण्याचा मान बेळगावला मिळाला आहे. होनगा औद्योगिक वसाहतीतील हैड्रोपॅक इंडिया प्रा. लि.ने ‘मेक इन इंडियां’तर्गत या मशीनची निर्मिती केली आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी या मशीनची यशस्वी चाचणीही घेतली. लवकरच ती दिल्लीला पाठविण्यात येणार आहे.

दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने यापूर्वी युरोपीयन बनावटीची मशीन कोचीससह खरेदी केली होती. त्यानंतर सरिता विहार व मुंडका डेपोसाठी दोन मशीन हव्या होत्या. त्यासाठी दिल्ली मेट्रोने जागतिक निविदा (ग्लोबल टेंडर) मागविल्या होत्या. हैड्रोपॅकनेही या प्रक्रियेत भाग घेऊन कंत्राट मिळवले. कंपनीने आपल्या होनग्यातील युनिटमध्ये युरोपीयन बनावटीच्या तोडीस तोड पूर्णत: भारतीय बनावटीची मशीन बनवली. ही मशीन युरोपियन मशीनपेक्षा जवळजवळ निम्म्या किमतीत तयार झाली आहे. मशीन बनविण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला.

हैड्रोपॅकचे संचालक (टेक्‍निकल) श्रीनिवास हुद्दार, संचालक (ऑपरेशन्स) अमित दरेकर, व्यवस्थापकीय संचालक सुधीर दरेकर व रघुराज जकाती यांच्यासह कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हैड्रोपॅक ही हैड्रोलिक प्रेासेस, सिलिंडर्स, जॅक्‍स आदी उत्पादने बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीने यापूर्वी भारतीय रेल्वेच्या विविध कार्यशाळांना बोगी बनविण्यासाठी व तपासण्यासाठी पंधराहून अधिक मशिन्स दिल्या आहेत. ही कंपनी आयात पर्यायी (इंपोर्ट सब्स्टिट्यूट प्रॉडक्‍ट्‌स) बनविण्यात अग्रेसर आहे. यापूर्वी पीएसएलव्ही लाँचिंग पॅड, न्युक्‍लिअर पॉवर प्लॅंट्‌स, हैड्रोजनरेटर प्रोजेक्‍ट्‌स, जहाज बांधणी, ऑटोमोबाईल आदी क्षेत्रांसाठी अनेक उपकरणे बनविली आहेत. 

आम्ही पूर्णत देशी बनावटीची व जागतिक दर्जाची बोगी टेस्टिंग मशीन बनली आहे. देशात हे पहिल्यांदाच घडले आहे. यापूर्वी अशा मशीन्स युरोपातून आयात केल्या जात होत्या. पण, आम्ही ही मशीन निम्म्या किंमतीत बनविली आहे. यामुळे हैड्रोपॅकबरोबर बेळगावचे नाव जगभरात पोचले आहे.
-सुधीर दरेकर, 

व्यवस्थापकीय संचालक, हैड्रोपॅक
 

Web Title: Belgaum News Bogie Testing Machine manufacture by Hydropack