बेळगाव: पाण्यावरून झेडपीत सीमाप्रश्नाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

महाराष्ट्राने मे महिन्यात कोयनेतून 4 टीएमसी पाणी कर्नाटकाला दिलं होतं. तशी मागणी करण्यासाठी कर्नाटक भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्या पथकात खुद्द लक्ष्मण सवदीही होते. 

बेळगाव : महाराष्ट्रात जायची मागणी करता, मग खानापूर तालुक्याला योजनांची गरज काय आहे, असा प्रश्न भाजप आमदार व माजी मंत्री लक्ष्मण सवदी यांनी विचारून म. ए. समितीचे आमदार अरविंद पाटील यांच्या मागणीला विरोध केला. यावेळी आमदार अरविंद पाटील यांनी चांगलेच उत्तर दिले, 'मी केवळ खानापूरला पाणी मागतोय.पण, संपूर्ण कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातून पाणी येतं त्याचे काय' असा सवाल उपस्थित करून सवदी यांना गप्प केलं.

महाराष्ट्राने मे महिन्यात कोयनेतून 4 टीएमसी पाणी कर्नाटकाला दिलं होतं. तशी मागणी करण्यासाठी कर्नाटक भाजपचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्या पथकात खुद्द लक्ष्मण सवदीही होते. 

महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणातूनही दरवर्षी कर्नाटकला पाणी देतो. तरीही सीमावासीयांच्या मागण्या आल्या की कर्नाटकी नेत्यांना सीमाप्रश्न आठवतो. जीवनावश्यक असलेलं पाणी, बियाणं, खतं या वस्तू सोडल्या तर सीमावासी कसल्याही विकासकामांची मागणी कर्नाटककडे करत नाहीत.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Belgaum news border issue