"हालसिध्दनाथ'च्या अध्यक्षपदी चंद्रकांत कोठीवाले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

निपाणी - येथील हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी चंद्रकांत कोठीवाले तर उपाध्यक्षपदी एम. पी. पाटील यांची बिनविरोध निवड झाली. प्रा. सुभाष जोशी व अनिता पाटील यांनी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासांठी कारखाना कार्यालयात आज (ता. 29) निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकारी संघाचे जिल्हा उपनिबंधक के. एल. श्रीनिवास उपस्थित होते. 

सकाळी साडेदहा वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी अर्ज मागविण्यात आले. यावेळी अध्यक्षपदासाठी चंद्रकांत कोठीवाले यांनी तर उपाध्यक्षपदासाठी एम. पी. पाटील यांनी अर्ज दाखल केला. वेळेत दोनच अर्ज आल्यावर कारखाना संचालकांची अधिकारी श्रीनिवास यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी अध्यक्षपदासाठी संचालक पप्पू पाटील यांनी कोठीवाले यांचे नाव सुचविले तर आप्पासाहेब जोल्ले यांनी त्याला अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी विश्‍वनाथ कमते यांनी एम. पी. पाटील यांचे नाव सुचविले. त्याला अविनाश पाटील यांनी अनुमोदन दिले. 

दरम्यान अधिकारी श्रीनिवास यांनी दोनच अर्ज आल्याने अध्यक्षपदी कोठीवाले यांची तर उपाध्यक्षपदी पाटील यांची घोषणा केली. निवडीनंतर अधिकारी के. एल. श्रीनिवास यांनी कोठीवाले व पाटील यांचे अभिनंदन केले. बैठकीस कार्यकारी संचालक एस. एस. पुजारी, संचालक प्रा. सुभाष जोशी, पप्पू पाटील, आप्पासाहेब जोल्ले, विश्‍वनाथ कमते, रामगोंड पाटील, अविनाश पाटील, समीत सासणे, जयवंत कांबळे, मल्लिकार्जुन पाटील, एन. बी. खोत  उपस्थित होते. 

प्रा. जोशी निवडीवेळी हजर 
निवडणूक बिनविरोध होईल की नाही याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. पण सकाळी निवडणूक कार्यक्रम सुरु झाल्यापासून प्रा. सुभाष जोशी यांच्यासह विरोधी गटाचे संचालक उपस्थित नव्हते. त्यामुळे बिनविरोध होण्याची शक्‍यता वाढली. दरम्यान संचालक मंडळाच्या बैठकीवेळी प्रा. जोशी यांच्यासह त्यांच्या समर्थक संचालकांचे आगमन झाले. 

Web Title: Belgaum News Chadrakant Kothiwale as Halshidhanath President