चेन्नई-बेळगाव विमानसेवा सुरु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

बेळगाव - बेळगाव-चेन्नई विमानसेवा आजपासून सुरु झाली. पहिल्याच फेरीत चेन्नईहून 41 प्रवासी बेळगावात दाखल झाले. या सर्वांचे विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी स्वागत केले. परतीच्या प्रवासात 59 प्रवाशांनी बेळगावहून चेन्नईला सायंकाळी उड्डाण भरले. 

बेळगाव - बेळगाव-चेन्नई विमानसेवा आजपासून सुरु झाली. पहिल्याच फेरीत चेन्नईहून 41 प्रवासी बेळगावात दाखल झाले. या सर्वांचे विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी स्वागत केले. परतीच्या प्रवासात 59 प्रवाशांनी बेळगावहून चेन्नईला सायंकाळी उड्डाण भरले. 

स्पाईस जेटकडून सुरू करण्यात आलेल्या पहिल्याच विमानफेरीचा प्रवास आज उलटा घडला. आज सकाळी 9 वाजता आपली पहिली लॅंडींग करणारे चेन्नईतून येणारे विमान खराब हवामानामुळे बेळगाव ऐवजी बंगळूरला उतरले. तर पुन्हा बंगळूरहून उड्डाण भरून चेन्नईच्या प्रवाशांना घेऊन दुपारी साडेबारा वाजता सांबरा विमानतळावर लॅंड झाले. विमानतळ प्राधिकरणानेही जाहीर केलेले नव्या टर्मिनल बिल्डींगचा शुभारंभही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आला. 

नव्या टर्मिनल बिल्डींगचा कार्यारंभ चेन्नई-बेळगाव विमानसेवेने केला जाणार होता. पण, टर्मिनल इमारतीमधील तांत्रिक अडचणी आणि खराब हवामान यामुळे सर्वांवर पाणी फेरले गेले. सकाळी वेळेवर चेन्नई येथून प्रवाशांना घेऊन उड्डाण भरले. सकाळी 9 वाजता सांबरा विमानतळावर लॅंड होणे अपेक्षित होते. पण, खराब हवामानामुळे सांबरा विमानतळावर खाली न उतरता विमानाला घिरट्या घालत थांबावे लागले.

चार घिरट्या घातल्यानंतर लॅंडींग शक्‍य नसल्याने ओळखून विमान थेट बंगळूरकडे नेण्यात आले. अखेर पुन्हा बंगळूरहून विमानाने दुपारी उड्डाण भरले. त्यामुळे चेन्नई विमानाचे बंगळूरमार्गे बेळगावला दुपारी साडेबारा वाजता आगमन झाले. यावेळी विमानतळाच्या अग्निशमन केंद्रातर्फे विमानावर पाण्याचे फवारे उडवून विमानाचे स्वागत करण्यात आले. चेन्नईच्या पहिल्याच फेरीत चेन्नईहून 41 प्रवासी बेळगावात दाखल झाले. या सर्वांचे विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी स्वागत केले. परतीच्या प्रवासात 59 प्रवाशांनी बेळगावहून चेन्नईला सायंकाळी उड्डाण भरले. 

दरम्यान, चेन्नई-बेळगाव विमानसेवेने प्राधिकरणाकडून नवीन टर्मिनल बिल्डींगचा कार्यारंभ केला जाणार होता. पण, नव्या टर्मिनल बिल्डींगमध्ये अद्यापही काही तांत्रिक अडचणी दिसून आल्या असल्याने टर्मिनलचा कार्यारंभ थांबवून जुन्या टर्मिनल बिल्डींगचा मंगळवारी वापर करण्यात आला. तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतरच आता नव्या टर्मिनलचे कार्यारंभ केले जाणार असून यासाठी आणखी आठवड्याचा कालावधी लागणार आहे. 

Web Title: Belgaum news Chennai-Belgaum Airlines service started