महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यावर प्रवेश बंदी : झियाउल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

बेळगाव : सीमाभागात बेळगावात आज होणाऱ्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यावर येण्यास बंदी घालण्याचा परत एकदा आदेश जारी झाला आहे. जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी रविवारी रात्री हा आदेश जारी केला आहे. 

बेळगाव : सीमाभागात बेळगावात आज होणाऱ्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यावर येण्यास बंदी घालण्याचा परत एकदा आदेश जारी झाला आहे. जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी रविवारी रात्री हा आदेश जारी केला आहे. 

हिवाळी अधिवेशन विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती वतीने महामेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात अनेक दिगग्ज नेते महाराष्ट्र राज्यतून येणार आहेत. त्यांच्यावर प्रवेश बंदी घातली आहे. बेळगाव चे  जिल्हाधिकारी झियाउल्ला यांनी हा आदेश जारी केला आहे.  

यापूर्वीं एन. जयराम बेळगावचे जिल्हाधिकारी असताना महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते याना प्रवेश बंदी घालून कोगनोळी टोल नाका येथून परत पाठविले होते. आता महामेळाव्यानिमित्त परत तसेच आदेश जारी करण्यात आले आहे.12 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता ते 14 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंदी जारी करण्यात आले आहे, असे झियाउल्ला यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Belgaum News collector Zhiyaulla order