विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना स्वतंत्र बॅंक खात्याची सक्‍ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

बेळगाव - विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्याद्वारे निवडणुकीचा खर्च करण्याची सूचना जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी केली.

बेळगाव - विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी स्वतंत्र बॅंक खाते उघडून त्याद्वारे निवडणुकीचा खर्च करण्याची सूचना जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी केली.

आचारसंहिता नियमावली, निवडणूक खर्च व्यवस्थापन, प्रसारमाध्यमांसाठी लागू आचारसंहिता आदींची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजिली होती. राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्च दाखविणे गरजेचे आहे. खर्चाचा तपशील कसा द्यावा, त्याचे स्वरुप काय असेल व त्याची माहिती देण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून खर्च तपशीलासाठी पुस्तिका प्रसिध्द केल्या आहेत. उमेदवारांनी रोखीने केलेले व्यवहार व बॅंक माध्यमातून केला जाणारा खर्च, दैनंदिन खर्चाची माहिती उमेदवारांना द्यावी लागेल. उमेदवारांनी एजंटांची नेमणूक केल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांना त्याची कल्पना देऊन नोंद करून घ्यावी. आचारसंहितेविषयी एजंट, समर्थक आणि पदाधिकाऱ्यांना माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

पुस्तिकेत दररोज निवडणुकीत होणाऱ्या खर्चाची नोंद करावी. निवडणूक प्रचारासाठी वाहनांच्या उपयोगाबाबत निवडणूक विभागाची परवानगी जरुरी आहे. विनापरवाना सभा घेतल्यास गुन्हा दाखल केला जाईल. 

माहिती व प्रसिध्दी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी केबलसह अन्य वाहिन्यांवर जाहिरात प्रसारितपूर्वी विहित नमुन्याचा अर्ज भरून द्यावा. परवानगी घेतल्यानंतरच जाहिरात प्रसारित करावी. जाहिरातीचा तपशील सादर करावा. त्यानंतरच जाहिरातीला परवानगी मिळेल, अशी माहिती दिली. निवासी जिल्हाधिकारी डॉ. एच. बी. बुदेप्पा, अबकारी खात्याचे उपसंचालक अरुणकुमार आणि काँग्रेस, भाजप, जनता दल, सीपीआय, एनसीपी, बसप पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जाहिरात प्रसारणासाठी परवानगीची सक्‍ती केबल टीव्ही, इतर वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ आणि बल्क मेसेजसह इलेक्‍ट्रॉनिक्‍सचा आधार घेऊन निवडणुकीचा प्रचार करण्यापूर्वी जिल्हा प्रसारमाध्यम समितीची पनवानगी घ्यावी. मुद्रण, इलेक्‍ट्रॉनिक माध्यमात प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातीवर लक्ष ठेवण्यासाठी माहिती प्रसारण खात्यातर्फे समिती स्थापली आहे. वृत्तपत्रात प्रसिध्द होणाऱ्या जाहिराती, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींवर ही समिती लक्ष ठेवून असेल. जाहिरातीची माहिती निवडणूक विभाग वा खर्च तपासणी अधिकारी, लेखा विभागाला नियमित द्यावी लागेल. संशयास्पद बातम्या, पेड न्यूज वाटल्यास कारवाई केली जाईल.

Web Title: Belgaum News compulsion of Bank account to candidate