चिक्काेडी जिल्हा मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

चिक्कोडी - स्वतंत्र चिक्कोडी जिल्हा मागणीसाठी खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सकाळी 11 वाजता  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन चर्चा केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, बेळगाव जिल्हा विभाजनाला त्याच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. चिकोडी जिल्हा होणे आवश्यक आहे, पण जिल्ह्यातील सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी येऊन मागणी करावी, असे सांगितले.

एस. वाय. हंजी यांनी, जिल्हा घोषणा न केल्यास २५ लाख लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार असल्याचे सांगितले. खासदार प्रकाश हुक्केरी यांनी, जिल्हा मागणी आंदोलन जोरात पेटले असून तातडीने जिल्हा घोषणा करण्याची मागणी केली.

यावेळी पंचम शिवलिंगेश्वर स्वामी, चंद्रकांत हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, मंत्री विनय कुलकर्णी, मंत्री एम. बी. पाटील यांच्यासह आंदोलक उपस्थित होते.

आंदोलन अधिक तीव्र करणार - संगप्पगोळ

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे म्हणणे योग्य आहे. खासदार प्रकाश हुक्केरी यांनी चिक्कोडी जिल्ह्यातील सर्वपक्षीय, काँग्रेस आमदार, खासदार, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांच्यासह शिष्टमंडळ नेण्याची गरज होती. त्यासाठी आणखी तीन दिवसांची मदत देत आहोत. त्यानंतर दिवस-रात्र उपोषण करणार व सरकारी कार्यालयांना टाळे ठोकण्यात येणार असल्याचे अांदाेलनाचे नेते बी. अार. संगाप्पगाेळ यांनी सांगितले.

Web Title: Belgaum News demand of Chikodi district