उत्तर कर्नाटक ध्वज फडकविल्याने बेळगाव सुवर्णसाैंध येथे गोंधळ 

महेश काशीद
मंगळवार, 31 जुलै 2018

बेळगाव - स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज सुवर्णसौध आंदोलनस्थळी काही काळ फडकविण्यात आल्याने खळबळ उडाली. आंदोलक नागेश गोलशेट्टी यांनी तसा प्रयत्न केल्यामुळे त्याला ताब्यात घेतले.

बेळगाव - स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज सुवर्णसौध आंदोलनस्थळी काही काळ फडकविण्यात आल्याने खळबळ उडाली. आंदोलक नागेश गोलशेट्टी यांनी तसा प्रयत्न केल्यामुळे त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, स्वामी व आंदोलकांची विधानसभा विरोधापक्ष नेते बी. एस. येडियुराप्पा यांनी भेट घेतली. आंदोलकांबाबत हलक्‍या भाषेमध्ये बोलून खिल्ली उडविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी क्षमा मागावी आणि मागण्यांवर तातडीने कार्यवाही सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली. 

स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्य निर्मिती आणि स्वतंत्र उत्तर कर्नाटक राज्याचा ध्वज फडकविण्याची घोषणा आंदोलकांनी केली होती. पण, मागील दोन दिवसांपासून मठाधिशांनी अनुमती दिल्यास स्वतंत्र ध्वज फडकवू, असा सूर काढण्यात येत होता. त्यासाठी उत्तर कर्नाटक राज्याचा स्वतंत्र ध्वज फडकविला जाणार वा नाही, त्याकडे लक्ष लागून होते.

आंदोलन सकाळी 11 वाजता सुरु झाले. विविध मठांचे स्वामी आंदोलनात सहभागी झाले. येडियुराप्पा थोड्या वेळांनी उपस्थित राहिले. मठाधिशांची भाषणे झाली. माजी मंत्री उमेश कत्ती यांचे भाषण सुरु झाले. त्यांच्या भाषणाची सांगता होत असताना नागेश गोलशेट्टी उठून तुमचे गोल गोल भाषण ऐकण्यासाठी आलो नाही. तीन वर्षापूर्वी तुम्ही उत्तर कर्नाटक विकासाची ग्वाही दिली होती. त्याअगोदरही अशीच स्वप्ने दाखवली. यामुळे स्वतंत्र राज्याची घोषणा करण्यात यावी, अशी मागणी केली. या कालावधीत काहीकाळ स्वतंत्र राज्याच्या ध्वज उपस्थित एका आंदोलकासह स्वामींनी फडकविले. यामुळे येथे काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

दुसरीकडे नागेश सातत्याने उत्तर कर्नाटक मागणीसाठी व्यासपाठीवरून घोषणा देत असल्याचे दिसून आल्याने पोलिस आयुक्त डी. सी. राजप्पा पढे सरसावले. त्यांनी त्याला ताब्यामध्ये घेतले. यामुळे काहीकाळ आंदोलकांमध्ये गोंधळ उडाला. 

अखंड कर्नाटकाला धक्का पोचविण्याचा बिलकुल उद्देश नाही. सातत्याने उत्तर कर्नाटकाकडे दुर्लक्ष केल्यास मागणीची ठिणगी भविष्यात नक्कीच उग्र रुपधारण करेल. त्याला तुम्हीच जबाबदार असाल, असे उपस्थित मठाधिशांनी सांगितले.

येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेण्याची गरज होती. आंदोलकांची मुख्यमंत्र्यांनी  खिल्ली उडवली. स्वतंत्र उत्तर कर्नाटकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यासाठी याबाबत क्षमा मागून विकास योजनांबाबत निर्णय घ्यावा, असे सांगितले. 

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या.. 

  • सचिवस्तरीय कार्यालय बेळगाव सुवर्णसौधला सुरु करावे 
  • बेळगावला दुसरी राजधानी म्हणून जाहीर करावे 
  • अधिवेशन व विविध समित्यांच्या सभा विधानसौधला घ्याव्यात 
  • उत्तर कर्नाटकातील समस्या युध्दपातळीवर सोडवाव्यात 
     

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News demand of separate North Karnataka