अंतर 4 किलो मीटर...खड्डे 350 ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

बेळगाव - शहरातील दर्जाहिन रस्त्यांचे पितळ उघड पडले आहे. टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते धर्मवीर संभाजी चौक या अवघ्या 4 किलो मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये तब्बल 350 खड्डे पडले असून या साऱ्या खड्ड्यांना हार घालून अभिनव पध्दतीने निषेध सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदविला.

बेळगाव - शहरातील दर्जाहिन रस्त्यांचे पितळ उघड पडले आहे. टिळकवाडी तिसरे रेल्वे गेट ते धर्मवीर संभाजी चौक या अवघ्या 4 किलो मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये तब्बल 350 खड्डे पडले असून या साऱ्या खड्ड्यांना हार घालून अभिनव पध्दतीने निषेध सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदविला. निष्कृष्ट दर्जांच्या रस्त्यांची निर्मिती करणाऱ्यांची चौकशी करावी. ठेकेदारांचा काळ्या यादीमध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. 

मुसळधार पावसाने खड्डे पडून रस्त्यांना डबक्‍याचे स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसत आहे. खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत. त्यामुळे खड्ड्यामध्ये पडून अपघात घडत आहे. त्याविरोधात आवाज उठवला. मात्र, प्रशासनाच्या पातळीवर कार्यवाही झाली नाही. अॅड. हर्षवर्धन व सहकाऱ्यांनी मिळून निषेध केला. खड्डे पडलेल्या ठिकाणी फुलांचा हार घातला. खड्ड्यांचा सत्कार करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 

बेळगाव शहराचा स्मार्टसिटी योजनेत समाविष्ट आहे. पण, रस्त्यांचा दर्जा सुमार आहे. केवळ 2 आठवड्यात रस्त्यावरील डांबर उघडून पडले आहे. रस्त्यातील टोकदार खडे बाहेर पडले आहेत. पहिल्या पावसातच रस्त्यांची दैना उडाली आहे. रस्त्यांच्या कामाची चौकशी केली जावी. ठेकेदारांनी लोणी लाटल्याचा संशय आहे. निःपक्षपाती चौकशी करावी आणि खड्डे बुजवण्यासाठी तातडीने आदेश देण्यात यावे, अशी मागणी केली. जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, अॅड. हर्षवर्धन पाटील, आदित्य पारीख, नितीन पाटील, शालीन मुल्ला यांनी भाग घेतला होता. 

""टिळकवाडी ते संभाजी चौकपर्यंत आणलेले 350 हार खड्ड्यांना घालून दर्जाहिन रस्त्याच्या कामाचा निषेध केला आहे. पहिल्या पावसात मुख्य रस्त्याची अशी अवस्था आहे. चौकशी केली जावी, ठेकेदाराचा काळ्या यादीत समाविष्टची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.'' 
- हर्षवर्धन पाटील 

सामाजिक कार्यकर्ते 

Web Title: Belgaum News distance 4 KM Potholes 350 in city