दिव्यांगांसाठी बेळगाव महापालिकेने खरेदी केलेल्या तीनचाकी मोपेड्सचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

बेळगाव - दिव्यांगांसाठी महापालिकेने खरेदी केलेल्या तीनचाकी मोपेड्सचे वितरण अखेर मंगळवारी झाले. महापौर बसाप्पा चिक्कलदिन्नी, उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 65 दिव्यांगांना मोपेड देण्यात आल्या. चार महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पण मोपेड मिळाली याचे समाधान दिव्यांगांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळाले. त्यानी महापालिका प्रशासनाच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली.

खरेदी करून महापालिका कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आलेल्या या मोपेड्स गेले चार महिने चर्चेत होत्या. मोपेड्सचे वितरण तातडीने होणे आवश्यक असताना चार महिने त्या पालिका कार्यालयाच्या आवारात धूळ खात पडून होत्या. मार्च महिन्यात ठेकेदाराने 65 मोपेड्सचा पुरवठा पालिकेला केला. लगेचच विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे लाभार्थीना त्यांचे वितरण करता आले नाही. पण 16 मे रोजी आचारसंहीता संपल्यावर लगेचच मोपेड्सचे वितरण व्हायला हवे होते. पण मे महिना संपला तरी वितरण झाले नाही. 'सकाळ' ने यासंदर्भातचे वृत्त प्रसिद्ध केले व पाठपुरावा केल्यावर जिल्हाधिकारी एस झियाउल्ला यांनी दखल घेतली.

मोपेड्सचे वितरण तातडीने करण्याचा आदेश दिला. त्यामुळे महापौर चिक्कलदिन्नी व आयुक्त कृष्णगौडा तायण्णावर यानी चर्चा करून तातडीने मोपेड्सचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी महापालिका कार्यालयाच्या आवारातच हा कार्यक्रम घेण्यात आला. ठेकेदाराची भेट घालून दिल्याशिवाय मोपेड्सचे वितरण होणार नाही ही जिद्द महापौर व काही नगरसेवकांना सोडावी लागली. या कार्यक्रमाला उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी उपमहापौर संजय शिंदे, आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष राजू बिर्जे व सदस्य. अर्थ स्थायीसमिती अध्यक्ष संजय सवाशेरी, नगरसेवक विनायक गुंजटकर, विजय भोसले, रूपा नेसरकर, शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, नगरसचिव लोकेश, आरोग्याधिकारी डाॅ. शशीधर नाडगौडा आदी उपस्थित होते.

Web Title: Belgaum News Distribution of Three Wheel Mops