हस्तीदंत भासवून हरणाची शिंगे विकणारे पाच अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

बेळगाव: हस्तीदंत म्हणून हरणाची शिंगे विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना आणि ते विकत घेऊन पाहणाऱ्या दोघांना अशा पाच जणांना आज (मंगळवार) पोलिसांनी अटक केली. हे सर्वजण खानापूर तालुक्‍यातील तरुण आहेत. त्यांच्याकडून 11 किलो 250 ग्रॅम हरणाची शिंगे जप्त केली असून, बाजारपेठेत त्याची किंमत 6 लाख 75 हजार रूपये होते.

नागेश मादार (23), रामचंद्र दळवी (26, दोघेही रा. मणतुर्गा, ता. खानापूर), रविंद्र बकोलकार (27, हडलगा, ता. खानापूर), परशुराम निलजकर (23) व अमन कणबर्गी (20, दोघेही रा. चापगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पहिल्या तिघा संशयितांनी उपरोक्त शिंगे जमविली होती. ती पांढरी दिसावीत यासाठी ती पॉलीश केलेली होती. या तिघांनी हे हस्तीदंत आहेत, असे सांगून परशराम व अमन यांना विक्री करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती सीसीबीचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस आयुक्त डॉ. डी. सी. राजप्पा यांना दिली. त्यांच्या व डीसीपी सीमा लाटकर, डीसीपी महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही कारवाई केली. या सर्वांवर बेळगाव ग्रामीण पोलिसांत वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: belgaum news elephant deer teeth crime arrested