सुळेभावीत वायूदल प्रशिक्षण केंद्राचा विस्तार सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

बेळगाव - वायूदल प्रशिक्षण केंद्राचा विस्तार केला जात आहे. केंद्राला जागेसाठी सांबऱ्यात आता भूसंपादनासाठी जागा नसल्याने सुळेभावी येथील वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या सर्व्हे क्रमांक ९६ मधील २०० एकर जमीन यासाठी संपादित केली जात आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, महसूल खात्याकडून यासाठी वन खात्याला नोटीस बजावण्यात आली आहे. 

बेळगाव - वायूदल प्रशिक्षण केंद्राचा विस्तार केला जात आहे. केंद्राला जागेसाठी सांबऱ्यात आता भूसंपादनासाठी जागा नसल्याने सुळेभावी येथील वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या सर्व्हे क्रमांक ९६ मधील २०० एकर जमीन यासाठी संपादित केली जात आहे. जमीन संपादनाची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून, महसूल खात्याकडून यासाठी वन खात्याला नोटीस बजावण्यात आली आहे. 

क्रेडल ऑफ इन्फंट्रीचा सन्मानप्राप्त बेळगावात मराठा लाईट इन्फंट्री केंद्रासह, कमांडो प्रशिक्षण तळ, सांबरा येथे वायूसैनिक प्रशिक्षण केंद्र, भुतरामट्टी येथे इंडो-तिबेट सीमा पुलीस, खानापुरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे कोब्रा कमांडो प्रशिक्षण केंद्र आहे. लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या बेळगावात देशातील एकमेव वायूसैनिक प्रशिक्षण केंद्र आहे. वायूसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व जवानांना प्रथम सांबरा येथील केंद्रात प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. यानंतर इतर प्रशिक्षणाच्या ठिकाणी त्यांना पाठविले जाते.

वायूसैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी सांबरा येथे दक्षिणेला केंद्र असून उत्तर दिशेला वायूसैनिकांच्या कुटुंबीयांसाठी निवासी घरे आहेत. तर प्रशिक्षणासाठी म्हणून बेळगाव येथे व्हॅक्‍सिन डेपोच्या मागील बाजूला असणाऱ्या तळाचा वापर केला जातो. याठिकाणी २० दिवसांचे लष्करी प्रशिक्षण वायूसैनिकांना दिले जाते. तरीही जमिनीची आवश्‍यकता भासत असल्याने सुळेभावी येथे भू-संपादनाची प्रक्रीया सुरू झाली आहे. 

प्रशिक्षणासाठी वापर
दोन महिन्यांपासून भू-संपादनाची प्रक्रिया सुरू असून, वायूदलाच्या अधिकाऱ्यांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत या जागेची पाहणी केली आहे. सध्या लष्कराला बेळगावात प्रशिक्षणासाठी जागेची कमतरता भासू लागली आहे. मराठा इन्फंट्रीमधील जवान गोळीबार सरावासाठी मारीहाळ येथे येतात. येथे गोळीबाराचा सराव करण्यासाठी यापूर्वीच जमीन संपादित केली आहे. आता त्यात सुळेभावीची भर पडणार आहे.  

वायूदलाने जिल्हा प्रशासनाकडे जमिनीची मागणी केली असून सुळेभावी येथील वन खात्याची २०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठीच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. लवकरच ही प्रक्रिया महसूल खात्याकडून पूर्ण केली जाणार आहे.
- श्री. महांतेश, 

तलाठी, सुळेभावी

Web Title: Belgaum News expansion of the Air Defense Training Center