रायबाग तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

एम. ए. रोहीले
बुधवार, 11 एप्रिल 2018

रायबाग - हळे डीगेवाडी ( ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आज सकाळी आत्महत्या केली आहे. रावसाब बाबु चौगुले (वय 40) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

रायबाग - हळे डीगेवाडी ( ता. रायबाग, जि. बेळगाव) येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आज सकाळी आत्महत्या केली आहे. रावसाब बाबु चौगुले (वय 40) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, शेतकरी रावसाब चौगुले यांनी शेतीसाठी बँकेतून तसेच इतरांकडून हात उसने कर्ज घेतले होते. कर्जाची वेळेत फरत फेड होत नसल्याने ते नाराज होते. आज सकाळी शौचालयास जातो असे घरी सांगून ते बाहेर पडले. त्यांनी नदीजवळ असलेल्या त्यांच्याच शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याच्या मागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद रायबाग पोलीस ठाण्यात झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Belgaum News farmer Suicide incident in Raibag Taluka