सुवर्णसौधसमोर फडकणार आज उत्तर कर्नाटकचा ध्वज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

बेळगाव - उत्तर कर्नाटक राज्याच्या निर्मितीसाठी उत्तर कर्नाटकाचा स्वतंत्र ध्वज मंगळवारी (ता. ३१) सुवर्णसौध येथे होणाऱ्या आंदोलनात फडकविला जाणार आहे.

बेळगाव - उत्तर कर्नाटक राज्याच्या निर्मितीसाठी उत्तर कर्नाटकाचा स्वतंत्र ध्वज मंगळवारी (ता. ३१) सुवर्णसौध येथे होणाऱ्या आंदोलनात फडकविला जाणार आहे.

या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून चर्चेतून मागण्यांवर तोडगा काढू, असे आवाहन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे. तरीही आंदोलक ठाम असून मठाधीश आंदोलनात भाग घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पाही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

आतापर्यंतच्या सर्वच पक्षांच्या सरकारने उत्तर कर्नाटकावर अन्याय केल्याचा आरोप करत १३ जिल्ह्यात २ ऑगस्टला बंदची घोषणा केली आहे. आंदोलनात ३० संघटना भाग घेणार असून अनुदान आणि निधी विनियोगात अन्याय झाल्याचा आरोप करत बंद पुकारला आहे. शाळा, कॉलेज, बस सेवा, सरकारी कार्यालये यादिवशी बंद ठेवण्यात यावे, असे आवाहन केले. 

९१ टक्‍के पाठिंबा
२ ऑगस्ट रोजी आंदोलनात उत्तर कर्नाटकातील ३० संघटना भाग घेतील, बंदमध्ये १३ जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, शाळा-कॉलेज, वाहन संचार बंद असेल. सर्वेक्षणात ९१ टक्के लोकांनी स्वतंत्र कर्नाटकाच्या मागणीला पाठिंबा जाहीर केल्याचे उत्तर कर्नाटक रयत संघाचे राज्य संचालक बसवराज करीगार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: Belgaum News flag of north Karnataka on suvarnasoudha