बेळगावात अवजड वाहनांचे चार बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

बारा तासांत दोन अपघात ः महामार्गावर हिंडाल्कोजवळ तिघे ठार, टाटा मोटर्सजवळ एक ठार

बेळगाव: शहर परिसरात बारा तासात झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघेजण ठार झाले. महामार्गावर हिंडाल्कोजवळ सावकाश केलेल्या कॅन्टरला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने तिघे ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. उद्यमबागमधील माणिकबाग शोरूम क्रॉसजवळ एका दुचाकीस्वाराला दूधवाहू टॅंकरने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला.

बारा तासांत दोन अपघात ः महामार्गावर हिंडाल्कोजवळ तिघे ठार, टाटा मोटर्सजवळ एक ठार

बेळगाव: शहर परिसरात बारा तासात झालेल्या दोन अपघातांमध्ये चौघेजण ठार झाले. महामार्गावर हिंडाल्कोजवळ सावकाश केलेल्या कॅन्टरला दुचाकीची पाठीमागून धडक बसल्याने तिघे ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. उद्यमबागमधील माणिकबाग शोरूम क्रॉसजवळ एका दुचाकीस्वाराला दूधवाहू टॅंकरने चिरडल्याने ते जागीच ठार झाले. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला.

हिंडाल्कोजवळ झालेल्या अपघातातील मृतांमध्ये बाळकृष्ण मारुती पिंगट (24, भातकांडे गल्ली), विनायक रघुनाथ जाधव (25, बापट गल्ली) व प्रतीक सुभाष जाधव (22, रा. बापट गल्ली) यांचा समावेश आहे. यापैकी बाळकृष्ण व विनायक हे जागीच ठार झाले, तर प्रतिकवर केएलईमध्ये उपचार सुरू असताना आज दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. उद्यमबागजवळ झालेल्या अपघातात याकुब शेखसुरब (46, रा. फोर्ट रोड) हे जागीच ठार झाले.

भातकांडे गल्लीतील एकटा व बापट गल्लीतील दोघे असे तिघे मिळून पल्स्‌रवरून रविवारी (ता. 10) रात्री बर्डे ढाब्यावर जेवणासाठी निघाले होते. बाळकृष्ण हा दुचाकी चालवत होता, त्याच्या पाठीमागे विनायक व प्रतिक बसले होते. ते महामार्गावरून जात असताना समोरून कॅन्टर निघाला होता. कॅन्टर चालकाचा फोन वाजू लागल्यामुळे त्याने अचानक कॅन्टर थांबविला. अचानक समोर थांबलेल्या कॅन्टरचा तिघांना अंदाज आला नाही. त्यामुळे दुचाकी कॅन्टरवर जाऊन आदळली. यामध्ये दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. बाळकृष्ण व विनायक आधी बसलेले असल्यामुळे त्यांच्या डोकीला व शरीराला गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले. सर्वात मागे बसलेला प्रतीक देखील गंभीर जखमी झाला. त्याला केएलईमध्ये दाखल केले होते. परंतु, उपचाराचा उपयोग न होता आज दुपारी तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर. आर. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. याची नोंद वाहतूक उत्तर विभाग पोलिसांत झाली आहे. अपघातग्रस्त कॅन्टर व चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेची वाहतूक उत्तर विभाग पोलिसांत नोंद झाली आहे.

टेक्‍निशियन टॅंकरखाली चिरडले
उद्यमबागमध्ये घडलेल्या अपघाताची माहिती अशी की, टाटा मोटर्समध्ये टेक्‍निशियन म्हणून काम करणारे याकुब शेखसुराब हे आज सकाळी नेहमीप्रमाणे कामासाठी माणिकबाग शोरूममध्ये आले. बाहेरील कॉल असल्याने ते लगेच बाहेर पडले. तेथील काम अटोपून पुन्हा शोरूमजवळ पोहोचले. परंतु, माणिकबाग शोरूमजवळ रस्ता क्रॉस करताना या क्रॉसच्या 50 फूट आधी तिसऱ्या रेल्वे फाटकाकडून खानापूरकडे निघालेल्या दुधाच्या टॅंकरने याकुब यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यानंतर रस्त्यावर पडलेल्या याकुब यांच्या उजव्या खांद्यावरून टॅंकरचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातस्थळीचे चित्र अंगावर शहारे आणणारे होते. घटनेनंतर चालकासह टॅंकर ताब्यात घेतला आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. वाहतूक दक्षिण विभाग पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

बापट, भाताकांडे गल्लीवर शोककळा
बापट गल्लीतील दोघे व भातकांडे गल्लीतील एक अशा तीन तरुणांचा अपघातात बळी गेल्यामुळे या दोन्ही गल्ल्यांवर शोककळा पसरली होती. बाळकृष्ण पिंगट व विनायक जाधव या दोघांवर आज दुपारी सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जखमी प्रतिकचा दुपारी तीन वाजता मृत्यू झाला. त्याच्यावर याच स्मशनाभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन तरुणांचा बळी गेल्याने बापट गल्लीतील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

Web Title: belgaum news four dead by two accident