कर्नाटकात सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

बंगळूर - राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती परिवहन मंत्री डी. सी. तम्मण्णा यांनी दिली. बुधवारी (ता.२०) पत्रकारांशी बोलताना सध्या बसच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री तम्मण्णा म्हणाले, ‘राज्यातील सर्व १९.६ लाख विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे खात्यावर ६२० कोटी रुपयाचा भार पडणार आहे. त्यापैकी २५ टक्के भार परिवहन खाते उचलणार असून बाकीची रक्कम शिक्षण खाते किंवा सरकारने भरावयाची आहे.’

बस तिकीट दरवाढीसंबंधात ते म्हणाले, ‘डिझेलच्या दरात वाढ झाली असली तरी बस तिकीट दरात सध्या वाढ करण्यात येणार नाही. खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यावर विचार करण्यात येत आहे. राज्यातील सर्व परिवहन विभागाकडून १५ टक्के तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. दरवाढ न केल्यास परिवहन संस्थेला ५०० कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. तरीही तिकीट दरात वाढ करण्यात येणार नाही.’

पार्किंग जागा असेल तरच कार नोंदणी 
स्वत:ची जागा असेल तरच नवीन कारची नोंदणी करण्याचा नवा नियम तयार करण्यावर विचार सुरू असल्याचे सांगून मंत्री तम्मण्णा म्हणाले, बंगळूरसह इतर शहरातील पार्किंग व वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी नवा नियम करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Belgaum News Free Bus pass to Student in Karanataka