लंकेश यांच्या मारेकऱ्यांना पकडा - गृहमंत्री परमेश्वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश व थोर विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याऱ्यांना तत्काळ जेरबंद करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी शनिवारी (ता. ९) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केल्या. गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली.

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश व थोर विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याऱ्यांना तत्काळ जेरबंद करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी शनिवारी (ता. ९) वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केल्या. गृहमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली.

पत्रकारांशी बोलताना परमेश्वर म्हणाले, लंकेश व कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली आहे. यासंबंधातील अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. त्यामुळे हल्लेखोर लवकरच जेरबंद होतील, अशी अपेक्षा आहे. पोलिस खात्यासमोरील आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यात येईल. १६ जूननंतर पुन्हा बैठक घेऊन चर्चा करू. गुन्हेगारीच्या घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेण्यास बजावले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाईचे स्वातंत्र्य देण्यात येईल.’

बैठकीला मुख्य सचिव रत्नप्रभा, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव रजनीश गोयल, पोलिस महासंचालक नीलमणी राजू, एच. सी. किशोरचंद्र, एम. एन. रेड्डी, ए. एम. प्रसाद, पी. के. गर्ग, प्रवीण सूद, एडीजीपी अलोक मोहन, परशिवमूर्ती, कमलपंत, एम. ए. सलीम, आर. पी. शर्मा, राघवेंद्र औरादकर, प्रताप रेड्डी, अमरकुमार पांडे, मालिनी कृष्णमूर्ती, पी. के. ठाकूर, बंगळूर शहर पोलिस आयुक्त सुनीलकुमार, आयजीपी उमेशकुमार, हरिशेखर, बी. के. सिंग, नंजूडस्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
परमेश्वर म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. प्रथम मंत्रिपदाची संधी मिळणाऱ्यांना दोन वर्षे व त्यानंतर मंत्रिपद मिळणाऱ्यांना तीन वर्षे मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. विस्तारानंतर आपल्याजवळील अतिरिक्त खाते नवीन मंत्र्यांना देऊ. एम. बी. पाटील व दिनेश गुंडूराव दिल्लीला का गेले मला माहीत नाही. असंतुष्टांशी काल चर्चा झाली. त्यांचे मनपरिवर्तन करू.

Web Title: Belgaum News Gouri Lankesh Murder case