‘त्या’ पिस्तूल प्रशिक्षकाचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

बंगळूर - पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांना पिस्तूलसह शस्त्रास्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षकांचा एसआयटीने शोध सुरू केला आहे. लंकेश यांच्यावर गोळ्या झाडलेल्या परशुराम वाघमारे याला बेळगाव, गोकाक, सिंदगी परिसरात प्रशिक्षण दिल्याचे वाघमारेने मान्य केले आहे. त्यामुळे त्याला प्रशिक्षण दिलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

भूमिगत राहून पाच राज्यांत अशा कृत्यात एक मोठी टोळी सक्रिय असल्याची माहिती अधिकाऱ्यांना उपलब्ध झाली आहे. लंकेश यांची हत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल मिळालेले नाही. गोळी झाडल्यानंतर एकाने आपल्या हातातून पिस्तूल काढून नेले. त्यामध्ये प्रशिक्षण देणारी व्यक्‍तीही होती, अशी माहिती वाघमारेने दिली आहे. प्रशिक्षकाला पकडल्यास आणखी किती जणांना प्रशिक्षण देण्यात आले, त्याची माहिती स्पष्ट होईल, असे तपास अधिकारी म्हणाले.

Web Title: Belgaum News Gouri Lankesh Murder case