परशुराम वाघमारेचा यू टर्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

बंगळूर - गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित परशुराम वाघमारे याने न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर (मॅजिस्ट्रेट न्यायालय) गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे.

बंगळूर - गौरी लंकेश हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित परशुराम वाघमारे याने न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर (मॅजिस्ट्रेट न्यायालय) गुन्हा कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्याचे विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) कबूल केलेल्या वाघमारेने आता युटर्न आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने गेले नऊ महिने शोध घेऊन सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चैकशी सुरू केली आहे. अलिकडेच वाघमारे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गौरी लंकेश यांची हत्या केल्याचे कबूल केले होते. आपला ब्रेन वॉश करून हे कृत्य करण्यास भाग पाडल्याचे वाघमारेने म्हटले होते. परंतु त्याने आता न्यायालयासमोर यु-टर्न घेतल्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्‍यता आहे.

वाघमारेस परप्पन आग्रहार कारागृहातून गुरूवारी (ता. २८) बाहेर आणले. इतर पाच संशयितांना व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे १९ व्या अतिरिक्त मुख्य मेट्रो पॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. परंतु वाघमारेने आपल्यावरील आरोप मान्य केले नाही. त्यानंतर संशयितांना ११ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. वाघमारेस तृतीय एसीएमएम न्यायालयासमोर हजर करून त्याचा जबाब नोंद करून घेतला. परंतु त्याने गुन्हा मान्य न केल्याने लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेली पिस्तुल किंवा नष्ट करण्यात आलेल्या पुराव्यांचा आता एसआयटी अधिकाऱ्यांना शोध घ्यावा लागणार आहे.

नवीनकुमार नार्को चाचणीस तयार
या प्रकरणात सर्वप्रथम अटक करण्यात आलेला संशयित के. टी. नवीनकुमार नार्को चाचणी करून घेण्यास तयार असल्याचे त्याचे वकील ए. वेदमूर्ती यांनी सांगितले. लंकेश हत्या प्रकरणातील कोणतीच गोष्ट लपवून ठेवणार नाही. साक्षीदारांकडून ताब्यात घेण्यात आलेली गोळी व गौरी लंकेश यांच्या शरिरातील गोळी यात कोणतेच साम्य नाही. त्यामुळे तो नार्को चाचणीला तयार असल्याचे त्याच्या वकीलांनी स्पष्ट केले.

Web Title: Belgaum News Gouri Lankesh Murder case