मराठी शाळेत कन्नड शाळेचा घाट

मराठी शाळेत कन्नड शाळेचा घाट

बेळगाव - महाव्दार रोड येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १२ मध्ये कन्नड शाळा स्थलांतरीत करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. याला शाळा सुधारणा समिती व मराठी भाषिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरातील अनेक मराठी शाळांमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न शिक्षण खात्याकडून होत असल्याचा आरोप करून हा प्रकार रोखणार असल्याचा निर्धार लोकांनी घेतला आहे.

फुलबाग गल्ली येथील सरकारी कन्नड शाळा क्रमांक ७ ही शाळा महाव्दार रोड येथील मराठी शाळेमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु स्थलांतरापूर्वी शाळा सुधारणा समितीला विश्‍वासात घेणे आवश्‍यक होते. सीआरसी एस. डी. पाटील यांनी सोमवारी सकाळी शाळेत जाऊन कन्नड शाळा भरविण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, अभिजित चव्हाण, राजू भातकांडे, दौलत साळुंखे आदींनी सीआरसी पाटील यांना भेटून मराठी शाळेत कन्नड शाळा भरविण्यास विरोध केला. याबाबत आमदार अनिल बेनके व आमदार अभय पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली.

महाव्दार रोड येथील शाळा फुलबाग गल्ली येथील विद्यार्थ्यांना दूर होणार आहे व फुलबाग गल्ली येथे दुसरी शाळा असतानाही महाव्दार रोड येथे कन्नड शाळा भरविण्याचा अट्टाहास का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. यावेळी पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश दिला आहे, अशी माहिती दिली. राहुल कुरणे, संदीप भातकांडे, जोतिबा पाटील, संतोष गुंजीकर, रुषभ चिखलकर, सोहन कळसेकर, सिध्दार्थ कोवाडकर, गणेश कंग्राळकर, कृष्णा प्रधान आदी उपस्थित होते.

शिक्षण खात्याने कोणत्याही प्रकारची माहिती न देता मराठी शाळेत कन्नड शाळा भरविण्याचा प्रयत्न केला आहे. हा निर्णय चुकीचा आहे.
- रेणू मुतगेकर
, माजी उपमहापौर

फुलबाग गल्ली शाळेतील विद्यार्थ्यांना महाव्दार रोड येथील शाळा दूर होणार आहे. त्यामुळे फुलबाग गल्ली परिसरातच कन्नड शाळा स्थलांतरीत करा, अशी मागणी केली आहे. 
- सुनील बाळेकुंद्री,
माजी नगरसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com