कागोडू तिम्मप्पांचा आगळा विक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बेळगाव - ज्येष्ठ नेते कागोडू तिम्मप्पा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नवा विक्रम केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात होणारी ही १५ वी विधानसभा निवडणूक असून, पैकी १३ निवडणुकांमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविली आहे. १९६२ मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढविली होती.

बेळगाव - ज्येष्ठ नेते कागोडू तिम्मप्पा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नवा विक्रम केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात होणारी ही १५ वी विधानसभा निवडणूक असून, पैकी १३ निवडणुकांमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढविली आहे. १९६२ मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढविली होती.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक झाली. आता २०१८ मध्ये होणारी निवडणूक पंधरावी आहे. विधान परिषदेच्या एका उमेदवारीसह आतापर्यंत १३ वेळा कागोडू तिम्मप्पा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. सोशालिस्ट पार्टीमधून तिम्मप्पा यांचा राजकारणात सक्रिय प्रवेश झाला. कायद्याचे शिक्षण घेत असतानाच १९५० मध्ये ते चळवळीत सक्रिय झाले. तेथून ते राजकारणाकडे आकर्षित झाले. सर्वप्रथम त्यांनी शिमोग्यातील सागर मतदारसंघातून १९६२ मध्ये निवडणूक लढविली होती. त्यांची ही पहिली निवडणूक काँग्रेस उमेदवार व्ही. एस. लक्ष्मीकाशप्पा यांच्या विरोधात होती. ३ हजार २९९ मतांनी तिम्मप्पा यांना पराभव स्वीकारावा लागला.
मात्र, १९६७ मध्ये झालेल्या पुढील निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी के. एच. श्रीनिवास अवघ्या ७४९ मतांनी विजयी झाले.

राजकारणात ते वाढत असल्याचाच हा संदेश होता. १९७२ च्या निवडणुकीत नशिबाने त्यांना साथ दिली. प्रथमच ते विधानसभेत सोशालिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून गेले. नंतर १९७८ मध्ये तिम्मप्पा यांचा पराभव झाला. मुख्यमंत्री देवरार्ज अर्स यांच्यामुळे प्रभावित होऊन कागोडू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री गुंडुराव यांच्या कार्यकाळात १९८० मध्ये तिम्मप्पा यांनी विधान परिषदेत प्रवेश मिळविला.

एस. बंगारप्पा यांनी काँग्रेस सोडून कर्नाटक क्रांतीरंग पक्ष सुरू केला. त्यावेळी मुख्यमंत्री गुंडुराव यांनी तिम्मप्पा यांना सोरब येथून बंगारप्पा यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरविले. मात्र, यात तिम्मप्पांचा पराभव झाला. त्यानंतर सागर येथून बंगारप्पा यांनी तिम्मप्पा यांच्याविरोधात निवडणूक लढविली. तेथे तिम्मप्पा विजयी ठरले. २००४ मध्ये बंगारप्पांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेथे आपल्या पाहुण्याकडूनच तिम्मप्पांना पराभव पत्करावा लागला. २०१३ मध्ये सागरमधून तिम्मप्पा विजयी ठरले. आता पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत.

Web Title: Belgaum News Karanataka Assembly Election