कित्तूर मतदारसंघात काँग्रेस, भाजपला आलटून पालटून संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

कित्तूर मतदारसंघात सुरवातीला धजदचे वर्चस्व होते. त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली. गेल्या दोन निवडणुकीत भाजपने  मुसंडी मारून मतदारसंघात कमळ फुलविले होते. सध्या येथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्‍यता आहे. 

कित्तूर मतदारसंघात सुरवातीला धजदचे वर्चस्व होते. त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली. गेल्या दोन निवडणुकीत भाजपने  मुसंडी मारून मतदारसंघात कमळ फुलविले होते. सध्या येथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांना भरघोस आश्‍वासने देत धजद पक्ष निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. गत निवडणुकीत या मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी पाच उमेदवार अपक्ष होते. उर्वरित आठ उमेदवार विविध पक्ष व संघटनांचे होते.

संभाव्य लढती
यंदा कित्तूर मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. उमेदवार निवडीवरून बंडखोरी झाली, तर धजद पक्षाला संधी मिळण्याचा अंदाज आहे. मुख्य लढत राष्ट्रीय पक्षांत असून, यापूर्वी धजदचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मतदारसंघात काँग्रेस व भाजपने चार वर्षांत आपली सत्ता बळकट केली आहे. 

या मतदारसंघात गत निवडणुकीचा आलेख पाहता निवडणूक लढविण्यासाठी भाऊगर्दी झाल्याचे दिसते. एकूण १३ उमेदवारांनी आपले भविष्य आजमावले होते. त्यापैकी पाच उमेदवार अपक्ष असल्याने मते विभागली होती. त्यांना १००० ते १६०० च्या घरात मते पडली. सध्या काँग्रेस, भाजप व धजद असा क्रम आहे.

गत निवडणुकीत झालेली मतदानाची आकडेवारी : ७७.७९ टक्के
उमेदवाराचे नाव     पक्ष     मते    टक्केवारी
डी. बी. इनामदार    काँग्रेस    ४५,९२४    ४२.८१
सुरेश मारिहाळ    भाजप    ३५,६३४    २८.२९
आनंद अप्पुगोळ    धजद    २०,५७    १६.०४ 
बाबूगौडा पाटील    केजेपी    ६८५०    ५.४४
 

 

Web Title: Belgaum News Karanataka Assembly Election Special