कर्ज माफीसाठी सोमवारी कर्नाटक बंद 

महेश काशीद
रविवार, 27 मे 2018

पक्षाची सत्ता आल्यास 24 तासात सरसकट पीक कर्जमाफी जाहीर करु, अशी घोषणा कुमारस्वामी यांनी केली होती. कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन दोन दिवस झाले. अजून कर्ज माफी जाहीर केली नाही. त्यादिशेने हालचाली दिसण्यास तयार नाही. त्यामुळे याविरोधात राज्यव्यापी आंदोलन भाजपने हाती घेतले आहे. सोमवारी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.

बेळगाव - पीक कर्ज माफीसाठी शेतकरी संघटना एकीकडे पुढे सरसावत असताना भाजपने त्यामध्ये आता उडी घेतली आहे. पक्षाची सत्ता आल्यास 24 तासात सरसकट पीक कर्जमाफी जाहीर करु, अशी घोषणा कुमारस्वामी यांनी केली होती. कुमारस्वामी मुख्यमंत्री होऊन दोन दिवस झाले. अजून कर्ज माफी जाहीर केली नाही. त्यादिशेने हालचाली दिसण्यास तयार नाही. त्यामुळे याविरोधात राज्यव्यापी आंदोलन भाजपने हाती घेतले आहे. सोमवारी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. युती सरकार स्थापनेनंतर भाजप पक्षाकडून सर्वात मोठे आंदोलन आहे. 

विधानसभा निवडणुकीत जाहीर प्रचार दरम्यान कुमारस्वामी यांनी पक्षाला स्वबळावर सत्ता प्राप्त झाल्यास शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करून डोक्‍यावरील कर्जाचे ओझे उतरविले जाईल, अशी घोषणा केली होती. पण, धजदला स्वबळावर सत्ता मिळाली नाही. कॉंग्रेस आणि धजदचे युती सरकार उदयास आले.

धजद नेते कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. पण, कर्जमाफी निर्णयापासून ते एक पाऊल पाठीमागे जात आहेत. युतीचे सरकार राज्यात आहे. त्यामुळे कर्ज माफीचा निर्णय मित्र पक्षाला विचारून घ्यावे लागेल, असा सूर आवळत आहेत. पण, भाजप याबद्दल आक्रमक आहे. लंगडी कारणे सांगून वेळकाढू भुमिका घेऊ नका. राज्यातील शेतकऱ्यांना कर्ज माफी देऊन दिलासा द्या, अशी मागणी उचलून धरली आहे. त्याचाच एकभाग म्हणून सोमवारी (ता.28) कर्नाटक बंदची हाक दिली आहे.

मोर्चा आणि रॅली काढण्याचे नियोजन आहे. युती सरकार स्थापनानंतर भाजपतर्फे मोठे आंदोलन हाती घेतले आहे. 

Web Title: Belgaum News Karanataka Bandh for debt waiver