शेती कर्जमाफीसाठी चिक्कोडीत मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

चिक्कोडी - शेतकऱ्यांच्या आशा, अपेक्षा उंचावून सत्तेवर येताच दिलेले आश्‍वासन विसरलेल्या धजदचे नेते व मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्जमाफीच्या निर्णयाला बगल दिली आहे. त्यामुळे आज (ता. 28) सकाळी चिक्कोडी येथे भाजपच्यावतीने मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. 

सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन केले होते. इंदिरानगर येथील भाजप कार्यालयापासून निपाणी-मुधोळ रस्त्यावरुन तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यात शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले. 

अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, "कुमारस्वामी यांनी सत्तेवर येताच 24 तासात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. सत्तेवर येताच त्यांना याचा विसर पडला असून घोषणेला ते आता बगल देत असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करेपर्यंत भाजप हा संघर्ष सुरु ठेवणार आहे.' जगदीश कवटगीमठ यांनीही, सत्तेवर येताच दिलेल्या आश्‍वासनापासून मागे हटलेल्या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर टीका केली. 

या वेळी सदलग्याचे माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब गुंडकल्ले, महेश भाते, सतीश आप्पाजीगोळ, बसवप्रसाद जोल्ले, नागेश किवड, जयानंद जाधव, कल्लाप्पा जाधव, माजी आमदार दत्तु हक्‍क्‍यागोळ, आप्पासाहेब चौगुला, प्रकाश पाटील, सतीश नूली, अन्वर दाडीवाले, शिवाप्पा पोगत्यानट्टी, विजय कोठीवाले, संजय कांबळे, संजय कवटगीमठ, पिंटु हिरेकुरबर, तुकाराम पाटील, महांतेश पाटील उपस्थित होते. 

Web Title: Belgaum News Karantaka Bandh