अभय पाटील, अनिल बेनकेंकडून भाजपतर्फे अर्ज दाखल

महेश काशीद
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

बेळगाव - माजी आमदार अभय पाटील यांनी आज  बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून, तर अॅड. अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघातून भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 

बेळगाव - माजी आमदार अभय पाटील यांनी आज  बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातून, तर अॅड. अनिल बेनके यांनी उत्तर मतदारसंघातून भाजपच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. 

भाजपच्या यादीत दोघांचीही अद्याप अधिकृत नावे जाहीर झाली नाहीत. याबाबत त्यांना विचारले असता पक्षाने आम्हाला  बी फॉर्म दिला असून त्यानुसारच आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा दावा दोघांनीही केला आहे. पक्षाकडून याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. अभय पाटील यांनी महापालिका आयुक्त कृष्णगौडा तायन्नवर यांच्याकडे त्यांनी अर्ज सादर केला. अॅड. बेनके यांनीही निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल केला.

बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातून भाजपतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार? याबाबत बेळगावकरांमधून उत्सुकता होती. दोन दिवसांपूर्वी बेंगळूर मधून दोघांनीही बी फार्म आणला आहे. त्यानुसार त्यांनी आज आपले अर्ज दाखल केल्याचा दावा केला.  भाजपच्या अंतिम यादीतील 70 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघात अद्याप मतभेद आहेत. हे मिटले की ही यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीमध्ये उपरोक्त दोघांचेही नाव असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election