कुणीगल, सोरबमध्ये बंधू आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

बंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर पाहिल्या आहेत. एकदा निवडणुकीत उतरले की सारेच रक्ताचे नाते विसरून जातात. त्यांच्यात ईर्षा निर्माण होते. एकमेकांविरुध्द जिंकण्यासाठी वाट्टेल ते करतात.

बंगळूर - निवडणूक ही अशीच असते. येथे रक्ताच्या नात्याला किंमत नसते. पिता-पुत्र, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, मामा-भाचा अशा अनेक नातेसंबंधांतील लढती आपण आजवर पाहिल्या आहेत. एकदा निवडणुकीत उतरले की सारेच रक्ताचे नाते विसरून जातात. त्यांच्यात ईर्षा निर्माण होते. एकमेकांविरुध्द जिंकण्यासाठी वाट्टेल ते करतात. अशाच दोघा भावांतील लक्षवेधी लढती शिमोगा जिल्ह्यातील सोरब व तुमकूर जिल्ह्यातील कुणीगल मतदारसंघात या वेळी पहावयास 
मिळणार आहेत.

कुमार बंगारप्पा विरुद्ध मधू बंगारप्पा (सोरब) माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांचे पुत्र कुमार बंगारप्पा (भाजप) व मधू बंगारप्पा (धजद) यांच्यामध्ये सोरब मतदारसंघात लक्षणीय लढत पहावयास मिळणार आहे. याआधीही या दोघा बंधूंनी एकमेकांविरुध्द लढत दिली होती. २००४ मध्ये कुमार बंगारप्पा काँग्रेसमधून व मधू बंगारप्पा यांनी भाजपमधून निवडणूक लढविली होती. २००८ मध्ये दोघे बंधू पुन्हा रिंगणात उतरले. मधू बंगारप्पा समाजवादी पक्षातून व कुमार बंगारप्पा काँग्रेस पक्षातून, परंतु विजय मिळविला तो भाजपचे उमेदवार हरताळू हालप्पा यांनी.

२०१३ मध्ये हे दोन्ही बंधू पुन्हा एकमेकांविरुध्द उभे ठाकले. परंतु, त्यांच्या पित्याच्या निधनाची सहानुभूती मधू बंगारप्पा यांना मिळाली नि ते विजयी झाले. आता चौथ्या वेळी हे दोन्ही बंधू एकमेकांविरुध्द निवडणूक रिंगणात उतरत आहेत. परंतु बदलत्या परिस्थितीनुसार आजवर काँग्रेस पक्षात असलेले कुमार बंगारप्पा आता भाजपतून निवडणूक लढविणार आहेत व मधू बंगारप्पा धजदमधून निवडणूक लढविणार आहेत. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते ते पहावे लागेल.

नागराजय्या विरुद्ध कृष्णकुमार (कुणीगल)
सलग तीन निवडणुकांत एकमेकाविरुध्द विद्यमान आमदार नागराजय्या (धजद) विरुध्द कृष्णकुमार (भाजप) हे दोघे बंधू तुमकूर जिल्ह्यातील कुणीगल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. २००८ च्या विधानसभा निवडणुकीत हे दोघेही बंधू एकमेकांविरुध्द उभे ठाकले होते. या दोघा बंधूंच्या भांडणात काँग्रेसचे रामस्वामी विजयी झाले होते. २०१३ मध्ये पुन्हा कृष्णकुमार भाजपमधून व नागराजय्या धजदमधून निवडणूक लढले. आता पुन्हा तिसऱ्यावेळी कृष्णकुमार यांनी भाजपची उमेदवारी मिळविली असून नागराजय्या धजदमधून निवडणूक लढवत आहेत. विजयश्री कुणाला मिळणार हे १५ मे रोजी स्पष्ट होईल.

Web Title: Belgaum News Karnataka Assembly election