कुमारस्वामींना किंगमेकर बनण्यापासून रोखणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

बंगळूर - भाजप आणि काँग्रेस राज्यात एकहाती सत्तेचा दावा करत असताना धजद यंदा ‘किंगमेकर’ बनेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. माजी मुख्यमंत्री व धजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे.

बंगळूर - भाजप आणि काँग्रेस राज्यात एकहाती सत्तेचा दावा करत असताना धजद यंदा ‘किंगमेकर’ बनेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. माजी मुख्यमंत्री व धजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे. यामुळे कुमारस्वामींविरोधात रामनगरमधून तुल्यबळ उमेदवार देऊन कडवी झुंज देण्याची तयारी भाजप, काँग्रेसने केली आहे. दुसरीकडे रामनगर मतदारसंघातून ९ अपक्ष उमदेवार रिंगणात आहेत.

खासदार कुमारस्वामींनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. रामनगरातून त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात १३ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी काँग्रेस पक्षातर्फे इक्‍बाल हुसेन एच. ए. आणि भाजपतर्फे लीलावती रिंगणात आहेत. न्यू इंडियन काँग्रेसतर्फे जे. टी. प्रकाश निवडणूक लढवत आहेत. उर्वरित उमेदवार अपक्ष आहेत.

काँग्रेस, भाजपकडून एकाहाती सत्तेचा दावा करण्यात येत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्‍यता आहे. अशा वेळी धजदची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. धजदचा टेकू घेऊनच सरकार स्थापन केले जाईल, असे मानले जात आहे. त्यामुळे कुमारस्वामी किंगमेकर ठरतील. कुमारस्वामी यांना शह देण्यासाठी आणि रामनगरमधून त्यांचा पराभव करण्यासाठी मातब्बर उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election