काँग्रेस आमदारांसमोर मोदींचा जयजयकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

बेळगाव - कामासाठी आमदारांकडे गेलं, की मत भाजपला घालता अन्‌ माझ्याकडे कामे घेऊन येता काय? असा प्रश्‍न करणाऱ्या आमदाराला आज नागरिकांनीही हिसका दाखवला. काम करायला नको, तर मग इकडे मते मागायला का आलात? असा प्रश्‍न विचारत त्यांच्यासमोरच मोदीऽऽऽ मोदीऽऽऽ चा नारा देत आम्ही भाजपलाच मतदान करणार, असे नागरिकांनी ठासून सांगितले.

बेळगाव - कामासाठी आमदारांकडे गेलं, की मत भाजपला घालता अन्‌ माझ्याकडे कामे घेऊन येता काय? असा प्रश्‍न करणाऱ्या आमदाराला आज नागरिकांनीही हिसका दाखवला. काम करायला नको, तर मग इकडे मते मागायला का आलात? असा प्रश्‍न विचारत त्यांच्यासमोरच मोदीऽऽऽ मोदीऽऽऽ चा नारा देत आम्ही भाजपलाच मतदान करणार, असे नागरिकांनी ठासून सांगितले. लोकांना समजावून शांत करेपर्यंत आमदारांना पुरेवाट झाली. रामदुर्ग तालुक्‍यातील काशीपेठ येथे सोमवारी (ता. ३०) काँग्रेसचे आमदार अशोक पट्टण यांच्या बाबतीत ही घटना घडली. 

निवडणुकीच्या प्रचारासाठी श्री. पट्टण काशीपेठ परिसरात गेले होते. या वेळी त्यांनी मतांची याचना करणारे भाषण सुरू करताच जमलेल्या नागरिकांतून काहींनी त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. ज्या वेळी आमच्या गावच्या समस्या घेऊन तुमच्याकडे आलो होतो, तेव्हा मते भाजपला घालता तर समस्या घेऊन माझ्याकडे का आलात? असे म्हणत आम्हाला परत पाठविले होते. मग आज तुम्ही आमच्याकडे मते मागायला का आला आहात? आम्ही तुम्हाला मते देणार नाही, अशी कडक भूमिका घेत नागरिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये हमरीतुमरीही झाली. परंतु पट्टण यांनीच दोन्ही गटांना शांत करत येथून काढता पाय घेतला. 

ग्रामस्थांचा पवित्रा

  •     कामे करत नाहीत तर मते मागायला का आलात म्हणून आक्रमक
  •     दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव 
  •     विकास करत नाही, तर तुम्हाला मत देणार नसल्याची भूमिका 
  •   दोन्ही गटांची समजूत काढत आमदारांचा गावातून काढता पाय
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election