काँग्रेसविरुद्ध धजदचे आरोपपत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

धर्मनिरपेक्षता ही आपली मक्तेदारी असल्याप्रमाणे काँग्रेस वागत आहे, परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावे काँग्रेसने अनेक चुका केल्या आहेत. त्याचे उत्तर आता जनता न्यायालयातच मागण्यात येईल, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

बंगळूर - लिंगायत धर्माच्या स्थापनेसह काही विषयावरील सत्ताधारी काँग्रेसच्या निर्णयांना आव्हान देऊन धजदचे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी  यांनी काँग्रेसविरुध्द चार्जसीट जाहीर केले आहे. धर्मनिरपेक्षता ही आपली मक्तेदारी असल्याप्रमाणे काँग्रेस वागत आहे, परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावे काँग्रेसने अनेक चुका केल्या आहेत. त्याचे उत्तर आता जनता न्यायालयातच मागण्यात येईल, असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.

वीरशैव लिंगायत समाजाचे विभाजन करणे हा निधर्मीपणा आहे का? असा सवाल करून त्यांच्या धार्मिक भावनांची कदर न करता सिध्दरमय्या यांनी हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका बाजूने समाजात फूट पाडायची. दुसऱ्याबाजूने सहानुभूती दाखवायची असा दुटप्पीपणा काँग्रेसने चालविला आहे.

अल्पसंख्यांकांना सहानुभूती दाखविणारी काँग्रेस आता हिंदूना सहानुभूती दाखवायला सरसावली आहे, असे ते म्हणाले. धजद पक्ष फोडून आमदारांचा राजीनामा घेतला, त्यासाठी सभापतीपदाचा दुरुपयोग केला. सहकारी संघातून घेतलेले ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली, परंतु त्याचा लाभ अजूनही शेतकऱ्यांना झाला नाही, हा द्रोह नाही का? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

कुमारस्वामींचे प्रश्‍न
धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करणाऱ्यांना सरकारने संरक्षण दिले का? असा प्रश्न करून निधर्मी तत्त्वाचे पालन करणारे डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्येला किती वर्षे झाली? पत्रकार गौरी लंकेश यांचे हत्यारे कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. ७० लाख रुपयाचे घड्याळ तुम्ही खरेदी केला की किक बॅक म्हणून कोणी भेट दिले? समाजवादी, गरिबांचे कैवारी समजणाऱ्या सिध्दरामय्या यांना लाखो रुपयांच्या घड्याळाचा मोह कसा झाला? 
 

Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election