बेळगावात उमेदवारांची ‘नॉक द डोअर’ मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

बेळगाव - जाहीर प्रचाराला जोर आलेला असताना आता घरोघरच्या प्रचारावरही उमेदवारींनी भर दिला आहे. काही उमेदवारांचे कार्यकर्ते घरोघरी फिरुन कुटुंब प्रमुखांचे मोबाईल क्रमांक टिपून घेत आहेत. मतदानापूर्वीच घरोघरी मतदारांच्या चिठ्ठ्या पोच करण्यासाठी हा आटापीटा केला जात आहे. गल्लोगल्ली ही ‘नॉक द डोअर’ मोहीम सुरू झाली आहे. 

ऊन तापतेय तसे उमेदवारांच्या प्रचाराचा वेगही वाढतोय. परंतु, प्रचाराच्या वाढलेल्या वेगावर तापलेल्या उन्हाचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक उमेदवार सकाळी लवकर प्रचाराला बाहेर पडून दुपारपर्यंत पुन्हा दरवाजाआड खलबते करण्यात गुंतलेले दिसून येत आहेत.

काही उमेदवारांनी आपली एक टीम गल्लोगल्ली पाठवून प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक मिळवण्यास सुरु केली आहे. प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडे मतदार यादी आहे. त्याद्वारे ‘नॉक द डोअर’ मोहीम राबविली जात आहे. मोबाईल क्रमांक कशासाठी, अशी विचारणा केली असता मतदार चिठ्ठ्या पोहोचविण्याची ही तयारी असल्याचे सांगण्यात आले.

मतदान मिळवण्यासाठी...

  •  कुटुंबप्रमुखांचा मोबाईल क्रमांक मिळविण्याची धडपड 
  •  मतदार चिठ्ठ्या देण्याची तयारी
  •  गल्लोगल्ली समर्थक लागले फिरु
  •  सकाळी मोहीम; दुपारी नियोजन
Web Title: Belgaum News Karnataka Assembly Election